कार्यक्षमता वाढवण्यासाठीचे पैलू- भाग २ Saam Tv
लाईफस्टाईल

कार्यक्षमता वाढवण्यासाठीचे पैलू- भाग २

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोणत्याही कामात यश संपादन करायचं असेल तर त्यासाठी आपली कार्यक्षमता असणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुमची कार्यक्षमता चांगली असेल तर त्या कामात नक्कीच यश मिळू शकतं. म्हणूनच, यापूर्वीच्या लेखात आपण कार्यक्षमता म्हणजे काय? किंवा कार्यक्षमता वाढविण्याचे पैलू कोणते हे पाहिलं. या भागातदेखील आपण कार्यक्षमता वाढविण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या पैलुंचा आढावा घेणार आहोत. Aspects for increasing efficiency

हे देखील पहा-

१. एकाग्रता (Concentration)

अनेकदा आपले लक्ष एका ठिकाणी थांबते, पण ते टिकत नाही. ही एकाग्रता एकाजागी दीर्घकाळ टिकवण्याची सवय नियमित ध्यान केल्याने लागेल. आपले चित्त एका ठिकाणी दीर्घकाळ एकाग्र न राहता परत परत विचलित होण्याला योगसूत्रात 'अनवस्थितत्व' म्हटले आहे.

२. आरोग्य (Health)

शरीरच लक्ष वेधत राहिल्यास मनाची एकाग्रता कशी साधता येईल? निरोगी आणि सुखदायक स्थितीत शरीर असण्यासाठी चार महत्त्वाच्या बाबी कारणीभूत आहेत. आहार, व्यायाम, झोप आणि योग्य जीवनशैली. असे समजा आहार म्हणजे गाडीत घालतो ते इंधन, नुसतं इंधन घालून गाडी बंद ठेवणे गाडीसाठी हानिकारक आहे, त्यामुळे तिला चालनात ठेवणे म्हणजे व्यायाम. गाडीचे नियमित केलेले सर्व्हिसिंग म्हणजे झोप आणि ती गाडी व्यवस्थित, प्रेमाने चालवणे म्हणजे योग्य जीवनशैली असणे. यातील प्रत्येक विषयावर वेगवेगळ्या लेखांमध्ये मी अगोदरच सविस्तर माहिती दिलेली आहेच. या चार गोष्टींची काळजी रोज घेतली तर त्या आपली काळजी घेतील.

दरम्यान, कार्यक्षमता, रोगप्रतिकारक शक्ती, मानसिक व शारीरिक स्वास्थ कसं राखावं याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी ‘सकाळ’ व ‘योग ऊर्जा’ यांनी एकत्रितपणे 'पोस्ट-कोविड रिकव्हरी प्रोग्रॅम'चं आयोजन केलं आहे. जर या कार्यक्रमात तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर प्रथम त्यासाठी नोंदणी करणं अत्यंत गरजेच आहे. म्हणूनच, या प्रोग्रॅममध्ये सहभागी होण्यासाठी या लिंकवर नक्की क्लिक करा आणि तुमची नाव नोंदणी करा.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli: एक-दोन नाही तर २०२४ मध्ये इतक्या वेळा शून्यावर बाद झालाय विराट!

Personality Development: अधिक आत्मविश्वास आणि आकर्षक होण्यासाठी 7 मार्ग

Maharashtra News Live Updates: सलमान खानला मारण्याची सुपारी घेणाऱ्याला पनवेल कोर्टात केलं हजर

Hansika Motwani Home: 'कोई मिल गया' फेम अभिनेत्रीच्या नवीन घराचे फोटो पाहिलेत का?

Karjat -Jamkhed Constituency: रोहित पवार आणि राम शिंदे आमने-सामने, कर्जत-जामखेडचे राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT