Painting SaamTv
लाईफस्टाईल

Painting Exhibition : चित्रात नेमकं काय पाहावं?

Prafulla Dahanukar : काहीवेळा चित्रप्रदर्शनात गेल्यावर तिथली चित्र कशी पहावी असा प्रश्न आपल्याला पडतो. विशेषता अमूर्त शैलीच्या चित्राबाबत पडतोच पडतो.

Saam Tv

मृगा वर्तक

काहीवेळा चित्रप्रदर्शनात गेल्यावर तिथली चित्र कशी पहावी असा प्रश्न आपल्याला पडतो. विशेषता अमूर्त शैलीच्या चित्राबाबत पडतोच पडतो. त्या चित्रात स्पष्ट रेषा दिसत नाहीत. मग यातलं आपल्याला काय कळतंय असा विचार करून आपण अशा चित्रांपासून दूरच राहतो. पण हे कितपत योग्य आहे? खरंतर चित्राचे सुद्धा संस्कार व्हावे लागलात. त्यासाठी आपण चित्र जास्तीत जास्त पहायला हवीत. लहान मुलांना लहान असताना चित्र काढण्यासाठी आपण कोऱ्या कागदावर चौकट आखून देतो. असं करण्याने त्यांच्या अभिव्यक्तीवर मर्यादा येत नाहीत का, हाही प्रश्न आहे.

या अमूर्त चित्रांबाबत सांगण्याचं कारण की, सुप्रसिद्ध चित्रकार प्रफुल्ला डहाणूकर यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या अमूर्त चित्रांचं प्रदर्शन जहांगीर कलादालनात ठेवण्यात आलंय. प्रफुल्ला एकाच माध्यमात अडकली नाही, संगीतासहित अनेक कलांवर त्यांचा जीव होता. Beth Citron या युरोपीयन आर्ट हिस्टरियनने तिच्या चित्रांचं संकलन केलं होतं. चित्रांची निवड उत्तम असली तरी गॅलरीतली चित्रांची प्लेसमेंट अजून उत्तम करता आली असती.

Drawing Exhibition

परंतु यातून अनेक प्रश्न उपस्थित होतात. चित्र पूर्ण झाल्यावर त्याच्या कोपऱ्यात सही करताना चित्रकाराला काय वाटत असेल हा कुतूहलाचा प्रश्न नेहमीच पडतो. पण कुतूहलला उत्तर नसतं, म्हणून याला प्रश्न नको म्हणायला. त्यातही अमूर्त चित्र हा आवडी-नावडी पलीकडचा विषय आहे. या स्त्रीच्या काही चित्रात तिची सही तेवढी ठळक वाटते. अर्थात ही अमूर्त चित्र नंतरच्या काळातली आहेत. तिच्या सुरुवातीच्या काळातलं काम पाहिलं की तिचा चित्रप्रवास लक्षात येतो.

पहिल्या चित्रात एक अर्धनग्न स्त्री डोक्यावर जबाबदारी घेऊन उघड्या शरीराची फिकीर न करता बिनधास्त नजर वर करून चालतेय. तिच्या छातीच्या उभारांपेक्षा तिचा चेहरा जास्त बोल्ड नाही वाटत? पुढच्या चित्रात फुलदाणी दिसतेय. आपलं गूढ सौंदर्य राखून आहेत फुलं पण तशी संभ्रमितच. त्याचा पॉट मात्र स्वतःचं अस्तित्व जाणून आहे. अमूर्त चित्रातल्या ठळक ओळीचं काही म्हणणं असतं. त्या पॉटची कडा कशी शार्प आहे पहा. तेवढीच.

Prafulla Dahanukar

समाज व्यवस्थेतले सगळे कडू गोड अनुभव, त्यातून आकाराला आलेली कलाकाराची अभिव्यक्ती धूसर रंगांतून येते का? धुसरतेकडे तुम्ही कसं पाहता? आर्टिस्ट त्याच्या रंगकामात गुंग असताना जेव्हा ठळक ओळी ओढतो तेव्हा त्याची भूमिका तो जाहीर करत असतो. प्रफुल्लाला काही सांगायचंय का? तिसऱ्या चित्रात तिची मुर्ततेकडून अमूर्ततेकडे वळतानाचं वळण स्पष्ट दिसतं. पण यातलं आकाश डार्क आहे. आयुष्याच्या मधल्या टप्प्यावर सुरुवातीच्या काळात आलेली एकामागोमाग वळणं आपण अत्यंत अस्वस्थतेत पार करत असतो. ही अवस्था धुंद असते.

मुंबईतल्या कलाचळवळीचा सुरुवातीचा काळ आणि पुरुषप्रधान समजव्यवस्थेतली स्त्री कलाकार कोणत्या मानसिक स्थितीत कॅनवासची साईझ निवडत असेल? रंग आणि फटकाऱ्यांवर तिचं स्वामीत्व असेलही पण समाजाच्या दृष्टिकोनाकडे ती कसं पाहत असेल? प्रफुल्ला मूळची गोव्याची पण मुंबईतल्या कलाचळवळीत तिचं मोलाचं योगदान आहे. नंतरच्या काळात पक्की मुंबईकर झालेली ती मात्र गोवा अगदी कळकळीने मांडत राहिली.

मला तिच्या सगळ्या चित्रात समुद्रच दिसले.. काहींना डोंगर दिसलेयत, काहींना आकाश, काहींना झाडी, बरंच काही. पण एक जाणवतं का, या रोलर फिरवलेल्या सगळ्या असंबद्ध वाटणाऱ्या अमूर्त चित्रांना एक शिस्त आहे. तिचे लेयर्स. त्या पॅटर्नशी ती प्रामाणिक आहे. अशांत चित्रकार पुढे जसा समंजसपणे स्वतःच्या चित्राकडे पाहू लागतो ना, ती प्रगल्भता या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातल्या स्थित्यंतरात दिसतेय.

अमूर्त चित्रांची मिमांसा कशी करावी? एखाद्याच्या अभिव्यक्तीला तोलून मापून पाहण्याचे निकष काय असतात? अमूर्त चित्र समीक्षा करताना, जे निकष समीक्षक वापरतो ते विकसित करताना तो कोणत्या प्रक्रियेतून जातो? मुळात चित्रांना समीक्षेची गरज असते का? चित्र केवळ चित्र नसतात. ती तेवढीच असतील तर समीक्षक त्याकडे ढुंकूनही पाहणार नाहीत. त्यात जेव्हा व्यवहार येतो, कमर्शीयल गोष्टी अंतरभूत होतात तेव्हा केवळ एक निकष तपासावा लागतो आणि त्यासाठी एकाच गोष्टीची गरज असते. तुम्हाला चित्रकाराचा प्रवास माहिती असायला हवा की मग तो त्याच्या कलाकृतिशी किती प्रामाणिक आहे हे तुम्हाला समजतं.

इकॉलॉजीज ऑफ ॲब्स्ट्राक्शन या चर्चासत्राचं आयोजन यानिमित्ताने करण्यात आलं होतं. तसंच प्रफुल्ला अ रेट्रोस्पेक्टिव्ह हे त्यांच्या चित्रांचं प्रदर्शन 14 डिसंबर पर्यंत सुरू असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT