Foot Itching Remedies saam tv
लाईफस्टाईल

Winter Foot Itching: थंडीच्या दिवसांत पायांच्या बोटांना खाज सुटतेय? लगेच करा हे 5 घरगुती उपाय, मिळेल आराम

Foot Itching Remedies: हिवाळ्यात पायांच्या बोटांमध्ये खाज आणि जळजळ होत असेल तर दुर्लक्ष करू नका. खोबरेल तेल, कोरफड, मॉइश्चरायझर आणि ओटमीलसारखे उपाय कसे मदत करू शकतात? जाणून घ्या पायांची काळजी घेण्याचे 5 सोपे घरगुती उपाय आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा.

Surabhi Jayashree Jagdish

हिवाळ्यात अनेकांना पायांच्या बोटांमध्ये खाज येण्याचा त्रास होतो. काही वेळा ही खाज इतकी वाढते की, वारंवार पाय खाजवावेसे वाटतात. जास्त वेळ बूट आणि मोजे घातल्यामुळे किंवा पायांमध्ये ओलावा राहिल्यामुळे हा त्रास आणखी वाढू शकतो. कदाचित तुमच्याही पायांच्या बोटांमध्ये खाज येत असेल तर पायांची स्वच्छता आणि योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. खाज आणि त्वचेची जळजळ कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय मदत करू शकतात. हे 5 उपाय कोणते आहेत ते जाणून घेऊया

खोबरेल तेल आणि एसेंशियल ऑइल

पायांच्या बोटांमध्ये खाज आणि जळजळ होत असेल तर त्वचेला आराम देणं गरजेचं आहे. यासाठी खोबरेल तेलामध्ये तुम्ही काही प्रमाणात लॅव्हेंडर किंवा पेपरमिंट एसेंशियल ऑइलचं थेंब मिसळून लावू शकता. पण एसेंशियल ऑइल कधीही थेट त्वचेवर लावू नका. कारण काही लोकांच्या त्वचेवर यामुळे जळजळ किंवा अॅलर्जी होण्याचा धोका असतो.

पायांना मॉइश्चरायझर लावा

पायांची त्वचा कोरडी झाल्यामुळे खाज येत असेल तर मॉइश्चरायझर लावल्याने आराम मिळू शकतो. यासाठी आधी पाय स्वच्छ पाण्याने धुवा. त्यानंतर स्वच्छ टॉवेलने पाय व्यवस्थित कोरडे करा आणि मग कोल्ड क्रीम किंवा मॉइश्चरायझर लावा. पण पायांच्या बोटांमध्ये ओलावा साचणार नाही याची काळजी घ्या.

बेकिंग सोडा

पायांची खाज कमी करण्यासाठी बेकिंग सोड्याचाही वापर केला जातो. परंतु बेकिंग सोड्यामुळे काही वेळा त्वचेला जळजळ होऊ शकते. त्यामुळे ज्यांची त्वचा सेंसेटीव्ही आहे त्यांनी हा उपाय करणं टाळावं.

कोरफडीचा गर

कोरफडीचा गर त्वचेला थंडावा देण्यास मदत करतो. त्यामुळे खाज आणि जळजळ होत असलेल्या जागी काही प्रमाणात आराम मिळू शकतो. यासाठी स्वच्छ कोरफडीचा गर किंवा जेल खाज येणाऱ्या भागावर लावा. पण कोरफड लावल्यानंतर जळजळ किंवा लालसरपणा वाढल्यास त्याचा वापर करू नका.

ओटमीलचा वापर

त्वचेची खाज आणि जळजळ कमी करण्यासाठी ओटमीलचा वापर केला जातो. यासाठी कोमट पाण्यात बारीक केलेले ओटमील मिसळा. या पाण्यात काही वेळ पाय बुडवून ठेवा. त्यानंतर पाय बाहेर काढून स्वच्छ टॉवेलने व्यवस्थित कोरडे करा.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

पायांच्या बोटांमध्ये सतत खाज येत असेल, त्वचा निघत असेल किंवा त्वचेवर लालसरपणा आणि भेगा दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. ही लक्षणं बुरशीचा संसर्ग किंवा अॅलर्जीमुळेही दिसू शकतात. अशा वेळी फक्त घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या. खाज अनेक दिवस कायम राहत असेल किंवा वाढत असेल, तर योग्य तपासणी करून घेणं गरजेचं आहे.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : MSF जवानांवरील वाढत्या हल्ल्यांची गंभीर दखल; हल्लेखोरांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश

Ramayana Collection : तिसऱ्या रविवारी 'रामायण'ची बॉक्स ऑफिसवर मोठी झेप, 'धुरंधर २'सह ९ चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले

Nashik Forts : हिवाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात नाशिकचे ७ किल्ले, सौंदर्य पाहून व्हाल थक्क

रायगड MIDC मधील कामगारांवर काळाचा घाला! पिकनिकवरून येताना कार कोसळून दोघांचा जागीच मृत्यू; वाहनाचा चेंदामेंदा

महाराष्ट्रावर चक्रीवादळाचं सावट? चक्राकार वाऱ्यांमुळे राज्याचं तापमान अचानक बदललं; हवामान विभागाने दिला मोठा इशारा

SCROLL FOR NEXT