Waking up 3 to 5 am saam tv
लाईफस्टाईल

Waking up 3 to 5 am: दररोज पहाटे ३ ते ५ दरम्यान जाग येतेय? आरोग्याबाबत शरीर देतंय गंभीर संकेत, वाचा

Sleep disturbance early morning: आपल्या शरीराच्या योग्य कार्यासाठी पुरेशी आणि शांत झोप अत्यंत आवश्यक आहे. झोपेच्या वेळी शरीर स्वतःला दुरुस्त करते, ऊर्जा पुन्हा निर्माण करते आणि मेंदू दिवसभरातील माहितीवर प्रक्रिया करतो.

Surabhi Jayashree Jagdish

रात्री ३ ते ५ वाजण्याच्या दरम्यान झोपेतून जाग येणं ही गोष्ट आता अनेकांसाठी सामान्य बनलीये. बर्‍याच वेळा आपण याकडे झोपमोड, थोडासा तणाव, चुळबुळ किंवा चहा-कॉफीची सवय म्हणून पाहतो. मात्र तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अशा वेळेला सतत जागं येणं केवळ शारीरिक थकवा नाही, तर हे तुमच्या मनातील खोल अस्वस्थतेचं किंवा शरीरातील circadian rhythm बिघडल्याचं लक्षणही असू शकतं.

काही लोक याला अध्यात्मिक जागरूकतेची सुरुवात मानतात. पण शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर ३ ते ५ वाजण्याच्या वेळेला “वुल्फ अवर” (Wolf Hour) म्हटलं जातं. ही अशी वेळ असते जेव्हा मेंदू जास्त भावनिक, हार्मोनल आणि मानसिक परिस्थितीत असतो. याच काळात आपल्या मनातले दबलेले विचार, चिंता, किंवा काही अज्ञात भावना बाहेर यायला सुरुवात होतात. चला पाहूया ही वेळ आपल्याला काय सांगते आणि यावर उपाय काय आहेत.

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, जर तुम्ही रोजच ३–४ वाजता जागे होत असाल आणि पुन्हा झोप येत नसेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या झोपेची अनेक चक्र असतात, जसं की हलकी झोप, दीर्घ झोप नंतर REM (Rapid Eye Movement) झोप, ज्यात स्वप्नं पडतात. या चक्रात एखाद-दुसऱ्यावेळी जागं होणं सामान्य असतं. मात्र सतत जागं होणं आरोग्याचे संकेत असू शकतात.

तणाव आणि चिंता

सततचा मानसिक ताण शरीराला अलर्ट स्थितीत ठेवतो. अशावेळी झोपेत असूनही मेंदू शांत होत नाही. दिवसभर मनात राहिलेल्या नकारात्मक विचारांचा भार, किंवा काही गोष्टी ज्या आपण दडपून ठेवतो त्या रात्री या वेळेस जागं करत असतात.

जैविक घड्याळाचा बिघाड

आपल्या शरीरातील नैसर्गिक घड्याळ म्हणजे circadian rhythm, हे आपल्याला झोपायला आणि जागं व्हायला मदत करतं. पण जर आपली झोपेची वेळ, वेळेवर जेवण नसेल, तर हे घड्याळ बिघडू शकतं. त्यामुळे रात्री लवकर जाग येणं ही त्याचीच एक प्रतिक्रिया असते.

हार्मोन्स आणि शरीरातील घडामोडी

रात्री ३ नंतर शरीरात ‘कॉर्टिसॉल’ नावाचं स्ट्रेस हार्मोन नैसर्गिकरीत्या वाढायला लागतं. पण जर तुम्ही आधीच तणावात असाल तर हे प्रमाण अधिक वाढतं आणि त्यामुळे शरीर स्वतःच जागं होतं. यामुळे झोप पूर्ण न होता, मेंदू आधीच अॅक्टिव होतो.

वुल्फ अवर

वुल्फ अवर ही अशी वेळ आहे जिथे आपल्या मेंदूतील अर्धवट विचार, स्वप्नं, भीती किंवा भावना एक्टि होतात. काही वेळा घाबरवणारी स्वप्नंही या काळात जास्त प्रमाणात पडतात. त्यातून जागं झाल्यावर पुन्हा झोप येणं कठीण होतं.

यावर कोणते उपाय करू शकतो?

दैनंदिन जीवनात बदल

रोज एकाच वेळी झोपायला जाणं आणि उठणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. रविवार असो वा सोमवार, वेळ न बदलता झोपण्याची सवय लावा. यामुळे शरीराचं घड्याळ स्थिर राहतं.

ध्यान, योगा आणि डीप ब्रीदिंग

झोपण्याआधी हलकं ध्यान किंवा श्वसन प्रक्रिया करा. यामुळे मन शांत होतं आणि झोप खोल लागते. याशिवाय योगासनेही झोपेसाठी फायदेशीर ठरतात.

झोपण्याचं वातावरण

तुमची बेडरूम शांत आणि थोडं थंडसर असायला हवी. झोपण्याआधी मोबाइल, टीव्ही यासारख्या स्क्रीनपासून दूर रहा.

आहाराकडे लक्ष

रात्री झोपण्याच्या अगोदर चहा, कॉफी, किंवा मद्य टाळा. हे पदार्थ झोपेवर वाईट परिणाम करू शकतात आणि जागं होण्याचं प्रमाण वाढवतात.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT