Skin Care Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Skin Care Tips : तुम्ही चेहऱ्यासाठी बॉडी लोशनचा वापर करताय? वेळीच थांबा, अन्यथा त्वचेला होईल अधिक नुकसान

थंडीच्या दिवसांमध्ये अनेक जणांची त्वचा कोरडी पडू लागते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Skin Care Tips : थंडीच्या दिवसांमध्ये अनेक जणांची त्वचा कोरडी पडू लागते. त्याचबरोबर त्वचा कोरडी पडल्याने त्वचा निस्तेज बनते आणि काळी पडू लागते. त्याचबरोबर अनेक लोक थंडीपासून आपला बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे बॉडी लोशन , कोल्ड क्रीम , फेस क्रीम अशा प्रकारच्या विविध क्रीम उपलब्ध असतात.

ज्यांचा वापर आपण थंडीच्या (Cold) दिवसांमध्ये जास्त करतो. परंतु चेहर्यासाठी आणि बॉडी साठी वेगवेगळ्या क्रीम असतात. अनेक लोक बॉडी लोशन चेहऱ्याला लावतात. परंतु असं करणे अत्यंत चुकीचे आहे. जाणून घ्या कारणे आणि लक्षणे.

बोडी लोशन अप्लाय करताना अनेक लोक चेहऱ्यावर देखील बोडी लोशन लावतात. परंतु असं करण्यात अत्यंत हानिकारक असते. बोडी लोशन हे बॉडी साठी बनवलेले असते. तुम्ही जर बॉडी लोशन चेहऱ्यावर लावलं तर त्याचे विपरीत परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील.

चेहऱ्यावरती फोड्या येणे पुरळ येणे चेहरा लाल पडणे अशा प्रकारच्या अनेक समस्या तुम्हाला उद्भवू शकतात. बॉडी लोशनचा पीएच लेवल खूप जास्त असतो. त्यामुळे आपल्या चेहऱ्याची त्वचा (Skin) बॉडी लोशन ला एकजोर्ब करून घेत नाही.

त्यामुळे बऱ्याचदा चेहरा चुरचुरणे, किंवा चेहऱ्याची आग होणे अशा समस्या उद्भवतात. चेहऱ्याला बॉडी लोशन लावल्याने चेहऱ्यावरील पोर्स बंद होतात. त्याचबरोबर चेहऱ्यामध्ये दूर जाऊन बसते आणि तुम्हाला ब्लॅकहेड्सचा प्रॉब्लेम होऊ शकतो.

त्वचा जास्त कोरडी होईल -

तुम्ही जर बॉडी लोशन चेहऱ्यावर लावत असाल तर. तुमची त्वचा लवकरात लवकर कोरडी पडू शकते. सतत चेहऱ्यावरती बॉडी लोशन लावल्याने चेहऱ्यामधील नॅचरल ऑइल संपून जाते आणि त्वचा सुकून जाते. त्यामुळे चेहऱ्यावरती बॉडी लोशनचा वापर केल्याने तुमच्या स्किन मधील ड्रायनेस वाढू लागते.

स्किन सेल्स होतील डायमेज -

बॉडी लोशन चा पीएच लेवल जास्त असल्याने चेहऱ्यावरती बॉडी लोशन लावल्याने चेहऱ्यावरचा पीएच लेवल कमी होतो. त्यामुळे तुमची स्किन डॅमेज होऊ शकते. बरोबर तुमच्या चेहऱ्यावर क्रॅक पडून सुरकुत्या देखील पडू शकतात.

चेहरा पूर्णपणे डल दिसेल -

थंडीच्या दिवसांमध्ये अनेक लोकांची स्किन डल पडते. थंडीच्या प्रादुर्भावामुळे लोकांची त्वचा कोरडी पडून सुरकुत्या पडतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या चेहऱ्याला बोडी लोशनपेक्षा कोणतीही फेस कोल्ड क्रीम , किंवा मॉइस्चरायझर वापरू शकता.

पिंपल्स आणि काळया डागांची समस्या उद्भवू शकते -

चेहऱ्याची काळजी घेताना अनेक व्यक्ती बॉडी लोषण आपल्या चेहऱ्याला लावतात. थंडीच्या दिवसात शरीराला बॉडी लोशन लावताना तोच हात अनेकदा चेहऱ्यावर देखील फिरवला जातो. मात्र यामुळे स्किन सुजते आणि जळजळ वाटते.

त्यामुळे बॉडी लोशन चेहऱ्याला कधीच लावू नये. यामुळे तुमच्या चेहऱ्याचे पोर्स ओपन होतात. बॉडी लोशन चेहऱ्याला लावल्यावर ते ओपन पोर्सला हानी पोहचवते.साठीचं वापरायचं नाहीतर होतील विपरीत परिणाम, जाणुन घ्या कारणे आणि लक्षणे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

Railway News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मुंबईसह ७ हाय-डेंसिटी कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाला मंजुरी

Maharashtra News Live Update: चालत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला; युवती जखमी

Face Care: चेहऱ्यावर वारंवार दिसतात व्हाइटहेड्स? डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय नक्की करुन बघा, ५ दिवसात दिसेल फरक

Thumb sucking in children: लहान बाळांची अंगठा चोखण्याची सवय कशी मोडाल?

SCROLL FOR NEXT