Dustbin Vastu Tips saa
लाईफस्टाईल

Dustbin Vastu Tips: किचनमध्ये कचऱ्याचा डबा ठेवताय? पण नेमका कुठे ठेवावा? वास्तुशास्त्रात सांगितलेत योग्य नियम

Kitchen Dustbin Vastu: वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये डस्टबिन कोणत्या दिशेला ठेवावा? दक्षिण, नैऋत्य आणि उत्तर दिशेबाबत कोणते नियम सांगितले आहेत? डस्टबिन ठेवताना कोणत्या चुका टाळाव्यात आणि घरातील सुख-शांतीसाठी कोणती काळजी घ्यावी, जाणून घ्या या महत्त्वाच्या वास्तु टिप्समधून.

Surabhi Jayashree Jagdish

घरातील किचन ही केवळ जेवण बनवण्याची जागा नाही तर वास्तुशास्त्रात या जागेला विशेष महत्त्व दिलं जातं. किचनचा संबंध घरातील सुख-शांती आणि कुटुंबाच्या आरोग्याशी जोडला जातो. त्यामुळे किचनमध्ये कोणत्या वस्तू कुठे ठेवाव्यात, याबाबत वास्तुशास्त्रात काही नियम सांगितले आहेत. आजकाल सोयीसाठी अनेकजण किचनमध्येच डस्टबिन ठेवतात.

पण डस्टबिन चुकीच्या जागी ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते, असं वास्तुशास्त्रात मानलं जातं. याचा परिणाम घरातील वातावरण, नातेसंबंध आणि मानसिक शांततेवर होऊ शकतो. अनेकदा घर स्वच्छ असूनही वातावरणात जडपणा जाणवतो किंवा घरातील व्यक्तींना सतत चिडचिड होते. अशावेळी किचनमध्ये ठेवलेल्या डस्टबिनची जागा आणि दिशा याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. डस्टबिन ठेवताना वास्तुशास्त्राचे कोणते नियम पाळावेत ते जाणून घेऊया.

किचनमध्ये डस्टबिन ठेवावा की नाही?

वास्तुशास्त्रानुसार, किचनमध्ये डस्टबिन ठेवणं शुभ मानलं जात नाही. असं केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि माता अन्नपूर्णा नाराज होऊ शकतात, अशी मान्यता आहे. पण काही कारणांमुळे किचनमध्येच डस्टबिन ठेवणं गरजेचं असेल तर त्यासाठी काही नियम पाळणं आवश्यक आहे.

डस्टबिन ठेवण्यासाठी कोणती दिशा योग्य?

वास्तुशास्त्रानुसार, घरातील दक्षिण किंवा दक्षिण-पश्चिम दिशा म्हणजेच नैऋत्य कोपरा डस्टबिन ठेवण्यासाठी योग्य मानला जातो. या दिशेला डस्टबिन ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा बाहेर जाण्यास मदत होते, अशी मान्यता आहे. त्यामुळे डस्टबिन ठेवताना या दिशेची निवड करणं चांगलं मानलं जातं.

'या' दिशेला चुकूनही डस्टबिन ठेवू नका

वास्तुशास्त्रानुसार, घराच्या उत्तर दिशेला डस्टबिन ठेवणं टाळावं. या दिशेला डस्टबिन ठेवल्याने घरात आर्थिक अडचणी, भांडणं आणि मानसिक अस्वस्थता वाढू शकते, असं मानलं जातं. याशिवाय देवघराच्या खाली किंवा देवघराच्या जवळही डस्टबिन ठेवू नये. असं केल्याने माता लक्ष्मी नाराज होऊ शकतात, अशी वास्तुशास्त्रात मान्यता आहे.

डस्टबिन ठेवताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

डस्टबिन नेहमी झाकण असलेलाच वापरावा. त्यामध्ये कचरा साचू देऊ नये. दररोज डस्टबिन रिकामा करून तो स्वच्छ ठेवावा. यामुळे किचनमध्ये घाण साचणार नाही आणि परिसर स्वच्छ राहील. वास्तुशास्त्रानुसार, घरात स्वच्छता ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होते आणि घरातील वातावरणही प्रसन्न राहतं.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Earthquake : बुलढाणा- जळगावला भूकंपाचे हादरे, गाढ झोपेत असताना पहाटे जमीन हादरली, नागरिकांची घराबाहेर धाव

Rava Ladoo Recipe: रोज संध्याकाळी खाण्यासाठी बनवून ठेवा स्वादिष्ट खमंग रव्याचे लाडू, वाचा सोपी रेसिपी

El Nino : अल-निनोमुळे भारतासाठी धोक्याची घंटा! २०२७ मध्ये उष्णतेचा रेकॉर्ड मोडणार, WHO कडून ग्रेड-3 अलर्ट जारी

Kangana Ranaut: कंगना रणौतच्या अडचणी वाढल्या, 'त्या' वादग्रस्त पोस्ट प्रकरणी FIR दाखल

SCROLL FOR NEXT