Poor sleep consequences Saam Tv
लाईफस्टाईल

Poor sleep consequences: रात्री उशिरा झोपूनही सकाळी लवकर जाग येते? ही 5 लक्षणं दिसली तर गंभीर असू शकतो

Sleep deprivation: उशीरा झोपून सकाळी लवकर उठण्याची सवय शरीर आणि मेंदूसाठी किती घातक ठरू शकते, झोपेच्या कमतरतेची सुरुवातीची लक्षणं, आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम आणि चांगली झोप मिळवण्यासाठी डॉक्टरांनी टिप्स दिल्या आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

तुम्हीही रात्री उशीरा झोपून सकाळी वेळवर उठता का तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला वाटत असेल की, यामुळे तुमच्या शरीराला विश्रांती मिळतेय. मात्र तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, तुमचा हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. काही दिवस नव्हे तर सतत कमी झोप घेतली तर राहिल्यास त्याचे परिणाम शरीरासोबतच मेंदू आणि मानसिक आरोग्यावरही हळूहळू दिसू लागतात.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, प्रौढ व्यक्तीने दररोज किमान 7 ते 9 तासांची झोप घेणं गरजेचं आहे. रात्री उशिरापर्यंत जागरण करून सकाळी लवकर उठण्याची सवय असल्यास मेंदूसाठी घातक ठरतेय. यामुळे मेंदूच्या अनेक कार्यांमध्ये अडथळा येऊ शकतो.

नोएडातील मानसोपचारतज्ज्ञ, व्यसनमुक्ती तज्ज्ञ आणि न्यूरोमॉड्युलेशन एक्स्पर्ट डॉ. समंत दर्शी यांच्या मते, सतत कमी झोप घेतली तर केवळ थकवा येत नाही तर त्याचे परिणाम संपूर्ण आरोग्यावर होत असतात. मेंदूला काम करण्यासाठी पुरेशा झोपेची आवश्यकता असते. झोपेमुळे मेंदू स्वतःची दुरुस्ती करतो, दिवसभरातील माहिती साठवतो आणि भावनांवर नियंत्रण ठेवतो. झोप अपुरी राहिल्यास तणाव वाढतो, लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येतात, योग्य निर्णय घेणं कठीण होतं.

कमी झोप शरीरासाठी धोकादायक का ठरते?

झोप ही शरीरासाठी नैसर्गिक दुरुस्तीची प्रक्रिया आहे. गाढ झोपेमध्ये मेंदूमध्ये नको त्या गोष्टी बाहेर टाकतो, पेशींची दुरुस्ती होते, हार्मोन्सचं संतुलन राखलं जातं आणि स्मरणशक्ती मजबूत होते. झोपेचा तुमच्या भावनांवरही मोठा परिणाम होतो. झोप कमी झाल्यास मूड नियंत्रित करणाऱ्या डोपामिन आणि सेरोटोनिन या रसायनांच्या कार्यावर परिणाम होतो.

शरीराकडून मिळणारे इशारे ओळखा

झोपेची कमतरता असल्यास शरीर तुम्हाला सुरुवातीला काही इशारे देत असतं. अनेकजण ही लक्षणं जीवनशैलीचा भाग समजून दुर्लक्ष करतात. मात्र पुढील लक्षणं दिसत असतील तर ती झोप अपुरी असल्याचे संकेत असू शकतात.

  • पुरेशी विश्रांती घेतल्यासारखं न वाटणं

  • दिवसभर ताजेतवानं राहण्यासाठी वारंवार कॉफीची गरज भासणं

  • दिवसाढवळ्या झोप येणं

  • लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणं

  • योग्य निर्णय घेणं कठीण होणं

कमी झोप घेतल्याने उद्भवणाऱ्या समस्या

वारंवार गोष्टी विसरणं

लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणं

कोणतीही प्रतिक्रिया देण्याचा वेग कमी होणं

नवीन गोष्टी शिकणं कठीण होणं

शरीरावरही होतात गंभीर परिणाम

कमी झोपेचा परिणाम फक्त मेंदूपुरता मर्यादित राहत नाही. त्याचा संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. सतत झोप अपुरी राहिल्यास पुढील समस्या उद्भवू शकतात.

  • रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होणं

  • रक्तदाब वाढणं

  • लठ्ठपणाचा धोका वाढणं

  • टाइप-2 मधुमेह होण्याची शक्यता वाढणं

त्यामुळे चांगली झोप ही शरीरातील चयापचय प्रक्रिया आणि हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

काही व्यक्तींना सकाळी लवकर जाग का येते?

रात्री उशिरा झोपूनही सकाळी वारंवार लवकर जाग येत असेल तर त्यामागे अनेक कारणं असू शकतात. डॉ. दर्शी यांनी याची कारणं सांगितली आहेत, ती पुढीलप्रमाणे-

  • जास्त ताणतणाव

  • झोपण्यापूर्वी मोबाईल, टीव्ही किंवा इतर स्क्रीनचा वापर

  • संध्याकाळनंतर जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी पिणं

  • कामाच्या अनियमित वेळा

  • झोपेशी संबंधित काही समस्या

चांगल्या झोपेसाठी काय कराल?

  • दररोज 7 ते 9 तास झोप घेण्याचा प्रयत्न करा

  • रोज शक्यतो एकाच वेळी झोपा आणि एकाच वेळी उठा

  • झोपण्यापूर्वी मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्हीचा वापर टाळा

  • संध्याकाळनंतर चहा, कॉफी किंवा कॅफिनयुक्त पेये कमी घ्या

डॉक्टरांचा सल्ला केव्हा घ्यावा?

अधूनमधून झोप न लागणं ही सामान्य बाब असू शकते. मात्र अनेक आठवडे सतत लवकर जाग येत असेल, झोप पूर्ण होत नसेल आणि त्यासोबत सतत चिंता, खचल्यासारखं वाटणं किंवा दैनंदिन कामांवर परिणाम होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रेयसीसमोरच'पेंद्या भाई’चा गेम; १६ वार करत संपवलं; पोलिसांनी ३६ तासात तिघांना ठोकल्या बेड्या

Health Tips After 40: वयाच्या 40 नंतर या 8 सवयी लगेचच बदला; अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाकडे पुनरागमन? भगवा लूक चर्चेत

बोगस वसतिगृहांनी लाटलं कोट्यवधींचं अनुदान, कागदावर विद्यार्थी, वस्तीगृहाला टाळं

वांगचुक रुग्णालयात, CJPच्या आंदोलनाचं काय? अभिजीत दिपके करणार अन्नत्याग आंदोलन

SCROLL FOR NEXT