Buying New Cooler Tips
Buying New Cooler Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Buying New Cooler Tips : नवीन Cooler खरेदी करण्याचा विचार करताय ? प्लास्टिक की, मेटल कोणते आहे फायदेशीर ?

कोमल दामुद्रे

Air Cooler : वाढत्या उन्हामुळे घरात कितीही फॅन लावले तरी गरम होतेच. त्यात ही गर्मी आपल्याला सहन होत नाही. अशातच त्यापासून सुटका हवी असल्यास आपण कुलर खरेदी करण्याचा विचार करतो.

विशेषत: उन्हाळ्याच्या हंगामात (Summer Season), जेव्हा तापमान अधिकच बिघडते, तेव्हा एअर कूलर मोठ्या प्रमाणात आराम देतात. प्रत्येकाला एसी वापरता येत नाही, पण बरेच लोक एअर कूलर नक्कीच वापरतात.

पाहायला गेले तर, एअर कूलर एसीपेक्षा स्वस्त मिळतात. धातूचे किंवा लोखंडाचे कुलर आणि प्लास्टिकचे कुलर असे दोन प्रकारचे कुलर बाजारात (Market) विकले जातात. आता यापैकी एक विकत घेताना आपल्याला कोणत्या गोष्टी तपासून पाहायला हव्या हे जाणून घेऊया.

1. प्लास्टिक एअर कूलर

प्लास्टिक एअर कूलर हलके आणि सहज फिरवता येईल असे असतात, ज्यामुळे ते घराच्या (Home) किंवा ऑफिसच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये वापरण्यासाठी अधिक चांगले असतात. शिवाय, ते अनेकदा मेटल एअर कूलरपेक्षा अधिक परवडणारे असतात, जे अनेक लोकांसाठी एक महत्त्वाचा घटक आहे. प्लास्टिक एअर कूलर डिझाईन्स, रंग आणि आकारांच्या आधारे विस्तृत श्रेणीत उपलब्ध आहेत, ज्यामुळे तुमच्या आवडीचे कूलर शोधणे सोपे होते.

स्टिक एअर कूलर जास्त टिकाऊ असतात. ते विद्युत प्रवाह चालवत नाहीत, म्हणून प्लास्टिकचे कूलर मुले किंवा पाळीव प्राणी असलेल्या घरांमध्ये वापरण्यासाठी योग्य मानले जातात. प्लास्टिक एअर कूलरला ऑपरेट करण्यासाठी कमी वीज लागते, ज्यामुळे कमी वीज बिल येऊ शकते. मात्र, प्लॅस्टिक एअर कुलरचे काही तोटेही आहेत. प्रथम, ते धातूच्या एअर कूलरइतके थंड होत नाहीत. तसेच, हे फार काळ टिकत नाहीत.

2. मेटल एअर कूलर

मेटल एअर कूलर हा एक उत्तम पर्याय आहे. हे प्लास्टिक एअर कूलरपेक्षा महाग आहेत, परंतु त्याचे अनेक फायदे देखील आहेत. मेटल एअर कूलर मोठ्या भागात थंड करण्यास फायदेशीर ठरतात. मेटल कूलरमध्ये मोटर आणि पंखा अधिक प्रमाणात सक्रीय असतो, जो जास्त हवा फिरवण्याचे काम करतो. मेटल एअर कूलर अत्यंत टिकाऊ असतात. हे झीज सहन करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत आणि कालांतराने तुटण्याची किंवा खराब होण्याची शक्यता कमी असते.

प्लास्टिकच्या एअर कूलरपेक्षा धातूचे कूलर जास्त काळ टिकू शकतात. परंतु, मेटल एअर कूलरचे काही तोटेही आहेत. प्लास्टिक एअर कूलरपेक्षा धातूचे कूलर अधिक मोठे असतात, ज्यामुळे त्यांना फिरणे किंवा अधिक काळ जपून ठेवणे कठीण होऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; सामान्यांना मोठा दिलासा

Thane Crime News: धक्कादायक! मुंबईत धावत्या ट्रेनमध्ये मॉडेलवर अत्याचार; घटनेनंतर ३९ दिवसांनी गाठले पोलीस ठाणे

Gurucharn Singh Return Home : अखेर 'तारक मेहता...'फेम अभिनेता २५ दिवसांनी घरी परतला, गुरूचरण सिंह इतक्या दिवस कुठे होता?

Heat Wave Alert : दिल्लीकरांवर सूर्य कोपला, १४ वर्षांचा तापमानाचा रेकॉर्ड तुटला; ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

Hair Care Tips: केसांना व्हिटॅमिन ई लावल्याचे फायदे काय?

SCROLL FOR NEXT