How To Keep Lizards Away Using Insecticidal Paint saam tv
लाईफस्टाईल

How To Keep Lizards Away: घरात पालींचा सुळसुळाट झालाय? खोली अशा पद्धतीने करा पेंट, आसपासही फिरकणार नाही पाल

How To Keep Lizards Away Using Insecticidal Paint: घराच्या भिंतीवर वारंवार पाल दिसतेय? घरात पाल येण्यामागे डास, माशा आणि इतर कीटक कारणीभूत असू शकतात. इन्सेक्टिसाइडल पेंट म्हणजे काय, तो कसा काम करतो आणि पालींचा त्रास कमी करण्यासाठी कोणते उपाय करावेत, जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

घराच्या भिंतीवर वारंवार पाल दिसत असेल तर तिला पळवून लावण्याचे उपाय करण्यासोबतच ती घरात येतेच कशामुळे, हे समजून घेणंही महत्त्वाचं आहे. घरात मच्छर, माशा आणि इतर छोटे कीटक असतील तर पालीला सहज अन्न मिळतं. त्यामुळे ती अशा ठिकाणी वारंवार घरात शिरकाव करते. अशावेळी घराला रंग देताना फक्त भिंतींचा रंग निवडण्याऐवजी एका खास प्रकारच्या पेंटचाही विचार करता येऊ शकतो.

काय आहे इन्सेक्टिसाइडल पेंट?

इन्सेक्टिसाइडल पेंट म्हणजे कीटकांचा त्रास कमी करण्यासाठी खास तयार केलेला रंग. या पेंटमध्ये कीटकांना नियंत्रित करणारे घटक मिसळलेले असतात. संशोधनानुसार, काही आधुनिक इन्सेक्टिसाइडल पेंटमध्ये कीटकनाशकाचे अतिशय छोटे कण असतात. पेंट भिंतीवर लावल्यानंतर आणि तो सुकल्यानंतर हे घटक हळूहळू बाहेर पडू शकतात. त्यामुळे डास आणि इतर कीटकांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकतं.

हा पेंट कसा उपयोगी ठरू शकतो?

इन्सेक्टिसाइडल पेंट थेट पालीला पळवून लावत नाही. या पेंटचा मुख्य उद्देश घरातील कीटक कमी करणं हा आहे. कारण पालीचं मुख्य अन्न म्हणजे छोटे कीटक. घरात डास, माशा आणि इतर कीटक कमी झाले तर पालीला खाण्यासाठी अन्नही कमी मिळेल. त्यामुळे घरात पाल येण्याचं प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते.

संशोधनात अशा पेंटचा वापर भिंती आणि इतर पृष्ठभागांवर करण्याबाबत अभ्यास करण्यात आला आहे. काही पेंटमधील कीटकनाशकाचे घटक हळूहळू बाहेर पडतात. त्यामुळे दीर्घकाळ कीटकांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.

पेंटिंग करताना या जागा मोकळ्या ठेवू नका

घरात पेंटिंगचं काम सुरू असेल तर भिंतींवरील लहान भेगा आणि फटी दुरुस्त करण्याची ही चांगली संधी आहे. खिडक्या, दरवाजे, पाईप आणि विजेच्या तारांच्या आजूबाजूला अनेकदा लहान जागा मोकळ्या राहतात. याच जागांमधून पाल आणि इतर छोटे जीव घरात प्रवेश करू शकतात.

त्यामुळे पेंट करण्याआधी अशा जागांची तपासणी करा. जिथे फटी किंवा मोकळ्या जागा दिसतील, तिथे त्या व्यवस्थित बंद करून घ्या. केवळ त्या जागेवर वरून रंग लावण्यापेक्षा आधी भेगा आणि फटी नीट बुजवणं जास्त फायदेशीर ठरतं. यामुळे पाल आणि इतर कीटकांना घरात येण्याचे मार्ग कमी होतात.

घरात कीटक असतील तर पालही येणारच!

पालीला घरापासून दूर ठेवण्यासाठी केवळ भिंतींना केलेलं पेंटिंग पुरेसं नाही. घरात डास, माशा आणि इतर छोटे कीटक जास्त असतील तर पालीला सहज अन्न मिळतं. त्यामुळे घराची स्वच्छता ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

स्वयंपाकघर आणि घरातील इतर भाग स्वच्छ ठेवा. खाण्याचे पदार्थ उघडे ठेवू नका. जमिनीवर किंवा स्वयंपाकघराच्या ओट्यावर अन्नपदार्थ सांडले असतील तर ते लगेच स्वच्छ करा. रात्री खिडक्या आणि दरवाजांजवळ गरजेपेक्षा जास्त प्रकाश ठेवणं टाळा. कारण प्रकाशामुळे अनेक कीटक आकर्षित होतात. घरात कीटक कमी असतील तर पालीलाही तिथे राहण्यासाठी फारसं कारण उरणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात इमारतींच्या मोकळ्या जागांमधील होर्डिंग्ज हटवा; युवासेनेचा इशारा

Shocking : ब्रेकअपचा राग अनावर! बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडचं घर पेटवलं; डोंबिवलीत खळबळ

महिलांसाठी सॉफ्ट सिल्कच्या साड्या , लेटेस्ट ट्रेडिग 5 डिझाईन्स

Relationship Age Gap : प्रेमाला वय नसतं, पण...हेल्दी रिलेशनशिपसाठी गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडच्या वयात किती अंतर असावं?

IND vs NZ Test: टेस्ट क्रिकेटमध्ये भारताचा ऐतिहासिक कारनामा, 150 वर्षांत पहिल्यांदाच घडली अशी विक्रमी कामगिरी; न्यूझीलंडही चक्रावलं!

SCROLL FOR NEXT