symptoms of heart attack in men and women saam tv
लाईफस्टाईल

World Heart Day: पुरुष-महिला यांच्यात हार्ट अटॅकची वेगळी लक्षणं दिसून येतात? पुरुषांमध्ये दिसतात ही लक्षणं

World Heart Day: दरवर्षी २९ सप्टेंबर रोजी वर्ल्ड हार्ट डे मानला जातो. या दिवसाच्या निमित्ताने आपण आज हार्ट अटॅकची पुरुषांमध्ये काय लक्षणं दिसून येतात, हे जाणून घेणार आहोत.

Surabhi Jayashree Jagdish

गेल्या काही काळापासून हॉर्ट अटॅक येण्याच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. यावेळी केवळ प्रौढ किंवा वयस्कर व्यक्ती नाही तर तरूणांमध्येही हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं दिसून येतंय. हा धोका टाळण्यासाठी हार्ट अटॅकची लक्षणं समजून घेणं गरजेचं आहे. दरम्यान अनेकांच्या मनात प्रश्न असतो की, महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये विविध प्रकारची लक्षणं दिसून येतात.

मुळात हार्ट अटॅक ही एक खूप गंभीर स्थिती असून याला ओळखणं फार कठीण आहे. यासाठी तज्ज्ञांनी आपल्याला पुरुषांमध्ये दिसणाऱ्या हार्ट अटॅकच्या लक्षणांची माहिती दिली आहे.

कल्याणच्या फोर्टीस रूग्णालयातील सीनियर कंसल्टेंट-इन्टरवेंशनल कार्डियोलॉजीस्ट डॉ. जाकिया खान म्हणाल्या, जेव्हा हृदयाला रक्तपुरवठा होणं थांबतो तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. ज्यामुळे हृदयाच्या स्नायूंचं देखील नुकसान होतं. जर ते वेळेवर याचं निदान होऊ शकलं नाही तर त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. काही प्रमाणात मृत्यू देखील होऊ शकतात. पुरुषांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणं सहसा स्पष्ट असतात. जसं की, छातीत दुखणं, पाठदुखी, छातीत जळजळ, जास्त घाम येणं, श्वास घेण्यास त्रास होणं, घसा, खांदे आणि हात दुखणे, थकवा येणं.

डॉ. खान पुढे म्हणाल्या की, मधुमेह असलेल्या लोकांमध्ये ही लक्षणं सायलेंट किलर्ससारखी असू शकतात. म्हणजेच ते जास्त संकेत न देता हानी पोहोचवू शकतात. हृदयविकाराचा झटका वेळेत ओळखून त्यावर त्वरित उपचार करता यावेत यासाठी या लक्षणांची जाणीव असणं गरजेचं आहे.

महिला आणि पुरुषांमधील लक्षणांतील फरक

पुरुष आणि महिलांमधील हार्ट अटॅकमध्ये असणारा फरक म्हणजे महिलांमध्ये दिसून येणारी लक्षणं सूक्ष्म असतात. तर दुसरीकडे पुरुषांमध्ये दिसून येणारी लक्षणं स्पष्ट असतात. ज्यामुळे त्यांचं लवकर निदान होणं गरजेचं आहे.

न्यूबर्ग लॅबचे व्यवस्थापकीय संचालक डॉ अजय शहा म्हणाले की, पुरुषांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणं अत्यंत गंभीर ते अगदी किरकोळ अशी असू शकतात. परंतु ही लक्षणं लवकर ओळखणं जीव वाचवणारे ठरू शकते. छातीत दुखणे किंवा अस्वस्थता हे सर्वात सामान्य लक्षण आहे. याशिवाय श्वास लागणं हे आणखी एक प्रमुख लक्षण मानलं जातं. या लक्षणांसोबत चक्कर येणं किंवा डोके हलकेपणाची भावना देखील असू शकते.

हृदयविकाराच्या पहिल्या लक्षणांवर ताबडतोब वैद्यकीय मदत घेणं महत्वाचं आहे. त्वरीत यावर उपचार घेतल्याने जीव वाचण्याची शक्यता वाढते आणि हृदयाचे नुकसान कमी होते, असंही डॉ. शहा म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PCMC: पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनात मोठे फेरबदल; एकाचवेळी २७२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

Bank Holiday News: पुढील आठवड्यात सलग 4 दिवस बँका बंद; SBI, HDFC सह सर्व बँकांच्या ग्राहकांनी आधीच तपासा सुट्ट्यांची यादी

Maharashtra News Live Update: जुन्नर तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन; गुंजाळवाडी, वडगाव सहाणी आणि सावरगाव परिसराला दिलासा

रोज सकाळी प्या मनुक्याचं पाणी, हे 5 आजार दूर होतील

विकृतीचा कळस! ६० वर्षीय नराधमांचा 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; कल्याण हादरलं

SCROLL FOR NEXT