Feet Massage  Saam Tv
लाईफस्टाईल

Health Care Tips: रात्री झोपण्यापूर्वी पायांच्या तळव्यांना लावा तेल, उन्हाळ्यात होणाऱ्या त्रासातून होईल तुमची सुटका

Feet Massage : उन्हाळ्यात पायांच्या तळव्यांची मालिश केल्याने खूप लाभदायी फायदे होतात.

Priya More

Health News : सध्या कडाक्याचा उन्हाळा (Summer) सुरु आहे. उन्हामध्ये होत असलेल्या गरमीमुळे अनेक शारीरिक समस्यांचा सामना सर्वांना करावा लागतो. उन्हाळ्यात शरिरामध्ये पाण्याची कमतरता कमी झाल्यामुळे खूपच थकवा येतो. त्याचसोबत उन्हाळ्यामध्ये गरम होत असल्यामुळे शांत झोप देखील घेता येत नाही. तुम्ही देखील अशा समस्यांचा सामना करत असाल तर तुमच्यासाठी हा लेख खूपच फायदेशीर ठरू शकते.

उन्हाळ्यामध्ये (Summer) पायांच्या तळव्यांना तेल (feet massage) लावले जात नाही. पण खरं सांगायचे झाले तर उन्हाळ्यात पायांच्या तळव्यांची मालिश केल्याने खूप लाभदायी फायदे होतात. हे फायदे जर तुम्हाला माहिती पडले तर तुम्हालासुद्धा आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. पायांच्या तळव्यांची मालिश केल्यामुळे तुम्ही उन्हाळ्यात ज्या शारीरिक समस्यांचा सामना करता त्या दूर होण्यास मदत होईल.

उन्हाळ्यात उष्णतेमुळे थकवा यतो, तणाव वाढतो, झोप येत नाही अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुम्हाला देखील उन्हाळ्यात दिवसभराचा थकवा दूर करायचा असेल किंवा तणावाच्या समस्येपासून सुटका मिळवायची असेल तर तुम्ही देखील हा उपाय करुन पाहू शकता. यासाठी तुम्हाला पायांच्या तळव्यांना तेलाने मालिश करावी लागेल. असे करणे खूपच फायदेशीर ठरेल. याचे नेमके काय फायदे होतात ते जाणून घेणार आहोत...

पायांच्या तळव्यांना तेलाने मालिश करण्याचे फायदे -

- पायाच्या तळव्याना नियमित तेलाने मालिश केल्यास निद्रानाशाच्या समस्येपासून आराम मिळतो. याशिवाय या मालिशमुळे तुम्हाला चांगली झोप देखील येते.

- तुम्हाला उन्हाळ्यात तणाव आणि चिंता दूर करायची असेल तर पायांच्या तळव्यांना मालिश करण्याचा उपया खूपच उपयुक्त ठरेल. एखादी व्यक्ती दीर्घकाळ तणावात राहते तेव्हा त्या व्यक्तीला मानसिक आजाराला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत पायांना नियमित मसाज केल्यास तुमची तणाव आणि चिंता या दोघातून सुटका होईल.

- पायांच्या तळव्यांची मालिश केल्यामुळे सांधेदुखीचा त्रास दूर होईल. कारण तळव्यांना मालिश केल्यामुळे पायांच्या नसा शिथिल होतात आणि शरीरात रक्ताभिसरण वाढते. जर तुम्ही सांधेदुखीने त्रस्त असाल तर तुम्ही पायांच्या तळव्यांची नियमित मालिश करणे फायदेशीर राहिल.

- स्त्रियांना जर मासिक पाळीच्या वेदना किंवा क्रॅम्प्सचा त्रास होत असेल त्यांच्यासाठी हा उपाय खूपच फायदेशीर आहे. हा त्रास दूर करण्यासाठी महिलांनी पायांच्या तळव्यांची नियमित मालिश करावी. असे केल्यामुळे त्यांना लवकर आराम मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Vannu The Great : लग्नासाठी धर्मांतर केलं, नवरा संसार अर्ध्यात सोडून पळाला; अभिनेत्री रडून रडून बेहाल

Crime News : जमिनीच्या वादातून अपहरण करत हत्या; शहापूर तालुक्यातील घटनेने खळबळ

Prajakta Koli: सोशल मिडीया स्टार प्राजक्ता कोळीची मराठीत एन्ट्री; 'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम'मध्ये साकारणार खास भूमिका

Maharashtra Live News Update: सरकारने काढलेला जीआर वादग्रस्त - छगन भुजबळ

Maharashtra Politics: योगेश कदम का? मग नितेश राणे फेल झाले का? – विनायक राऊतांनी डिवचले|VIDEO

SCROLL FOR NEXT