Mercenary Spyware  Saam Tv
लाईफस्टाईल

Mercenary Spyware : Apple कडून युजर्सना अलर्ट! iPhone वापरताय? फोन हॅक होण्याची भीती

Apple User Alert Cyber Crime : जर तुम्हीही आयफोन वापरताय तर ही महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे. Apple ने ९१ देशांसह भारतातील काही वापरकर्त्यांना सायबर हल्ल्याचा अर्लट मेसेज पाठवला आहे.

कोमल दामुद्रे

Apple Alert :

जर तुम्हीही आयफोन वापरताय तर ही महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे. Apple ने ९१ देशांसह भारतातील काही वापरकर्त्यांना सायबर हल्ल्याचा अर्लट मेसेज पाठवला आहे.

Apple ने अलर्ट दिला की, इस्त्रायली NSO गटातील वादग्रस्त पेगासस मालवेअरसह त्याच्या iPhones वर Mercenary Spyware द्वारे हल्ला केला जाऊ शकतो. नेमके काय आहे प्रकरण जाणून घेऊया.

इकॉनॉमिक्स टाईम्सच्या वृत्तानुसार गुरुवारी भारतातील काही वापरकर्त्यांना धमकीचे ईमेल पाठवण्यात आले. Apple कडून किती लोकांना अलर्ट गेला याविषयी कोणतीही माहिती मिळालेली नाही. ईमेलमध्ये NSO-ग्रुपच्या पेगासस स्पायवेअरचाही उल्लेख करण्यात आला. यामधून जागतिक स्तरावर लोकांना लक्ष्य केले जाते. हा अलर्ट कंपनीने भारतासह ९१ देशातील iPhone वापरकर्त्यांना पाठवला आहे.

Apple ने यापूर्वी अनेकदा दिले अलर्ट

अॅपलने युजर्सना दुसऱ्यांदा अलर्ट दिला आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये कंपनीने भारतासह इतर अनेक देशातील युजर्सना अलर्ट केले. यामध्ये कंपनी युजर्सना याबाबतची माहिती देत नाही. कंपनीने २०२१ पासून १५० हून अधिक देशांमधील वापकर्त्यांना असा ईमेल पाठवला आहे.

यापूर्वी Apple आणि Google या दोघांनीही भारतासह जगभरातील वापरकर्त्यांना अलर्ट सूचना पाठवल्या होत्या. त्यांनी सांगितले की, डिव्हाइसमधील डेटाचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो. इस्रायली कंपनी एनएसओने तयार केलेल्या स्पायवेअरवर पेगासस हल्ला करू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath shinde: समोर अमित शाह, एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरातची' घोषणा|VIDEO

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

SCROLL FOR NEXT