Heart attack symptoms saam tv
लाईफस्टाईल

Heart attack symptoms: छातीत दुखण्याव्यतिरीक्त हार्ट अटॅकची 'ही' इतरंही लक्षणं दिसतात; रात्रीच्या वेळेस होणारे बदल पाहा

Heart attack symptoms without chest pain: अनेकदा हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे इतकी सौम्य आणि वेगळी असतात की ती सहजासहजी ओळखता येत नाहीत. विशेषतः रात्रीच्या वेळी दिसणाऱ्या काही लक्षणांकडे तर अनेकदा दुर्लक्ष होतं.

Surabhi Jayashree Jagdish

  • हार्ट अटॅकमध्ये हृदयाच्या स्नायूंना ऑक्सिजन मिळत नाही.

  • छातीत दुखणे हे सर्वात सामान्य लक्षण आहे.

  • अत्यधिक आणि अचानक थकवा हार्ट अटॅकचे संकेत असू शकते.

हार्ट अटॅक ही एक गंभीर आणि जीवघेणी परिस्थिती आहे. ज्यावेळी हृदयाच्या एखाद्या भागाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत अडथळा निर्माण होतो तेव्हा त्या भागाला ऑक्सिजन मिळत नाही. परिणामी हृदयाचे muscle tissue हळूहळू नष्ट होऊ लागतं.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हा अडथळा अनेकवेळा हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या कोरोनरी आर्टरीमध्ये झालेल्या गाठीमुळे होतो. जर हा अडथळा वेळेवर काढून टाकला नाही, तर तो हृदयाला कायमस्वरूपी नुकसान करू शकतो. त्यामुळे हार्ट अटॅकची लक्षणं ओळखणं अत्यंत गरजेचं आहे. हार्ट अटॅकचं लक्षण म्हटलं की, छातीत दुखणं हेच अनेकांना माहितीये. मात्र या व्यतिरीक्त देखील हार्ट अटॅकची लक्षणं दिसून येतात.

थकवा

ही एक अत्यंत सामान्य आणि लक्षणीय लक्षण आहे. विशेषतः महिलांमध्ये हार्ट अटॅकच्या अगोदर थकवा जाणवतो. अगदी किरकोळ कामं केल्यावरही जास्त थकवा जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्षित करू नका. हा लक्षण लक्षात घेणं अत्यावश्यक आहे.

हृदयाचे ठोके अनियमित होणे

हृदयाचे ठोके खूप जलद झाले असतील किंवा अनियमित वाटत असतील तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. ही स्थिती हार्ट अटॅकच्या सुरुवातीचं संकेत असू शकते. अशावेळी डॉक्टरांचं म्हणणं नेहमी ऐकावं.

उल्टी किंवा मळमळ

हार्ट अटॅकच्या रुग्णांमध्ये मळमळ किंवा उलटी होण्याची भावना सामान्यपणे दिसून येते. काहींना पोट खराब झाल्यासारखं वाटू शकतं किंवा थेट उल्टी होते. हे लक्षण इतर लक्षणांबरोबर आढळल्यास ते गंभीर मानलं जातं.

इतर भागांमध्ये वेदना

हार्ट अटॅक म्हणजे फक्त छातीत दुखणं असं नाही. छातीतून सुरू झालेलं दुखणं डाव्या हातापर्यंत, मान, पाठ किंवा पोटापर्यंत पसरू शकतं. अशा प्रकारच्या वेदना पसरत असतील तर ते देखील हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं.

जबड्यांमध्ये वेदना

हार्ट अटॅकचं हे कमी ज्ञात असलेलं पण महत्त्वाचं लक्षण आहे. जर छातीतून दुखणं होत असताना ते दुखणं जबड्यांपर्यंत पोहोचत असेल आणि त्यासोबत इतर वरील लक्षणं देखील असतील, तर हे हार्ट अटॅकचं स्पष्ट संकेत असू शकतं.

हार्ट अटॅक झाल्यावर हृदयाच्या स्नायूंवर काय परिणाम होतो?

हार्ट अटॅकमध्ये हृदयाला रक्तपुरवठा होत नाही, त्यामुळे ऑक्सिजनच्या अभावाने स्नायूंचे ऊती नष्ट होऊ लागतात.

हार्ट अटॅकचे सर्वात सामान्य लक्षण कोणते?

हार्ट अटॅकचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीत तीव्र वेदना किंवा दाब जाणवणे.

थकवा हे हार्ट अटॅकचे लक्षण का मानले जाते?

विशेषतः महिलांमध्ये हार्ट अटॅकपूर्वी अचानक आणि अत्यधिक थकवा जाणवतो, अगदी किरकोळ कामानंतरही, त्यामुळे हे लक्षण महत्त्वाचे आहे.

हृदयाचे ठोके अनियमित होणे का गंभीर आहे?

हृदयाचे ठोके अचानक वाढणे किंवा अनियमित होणे हे हार्ट अटॅकच्या सुरुवातीचे संकेत असू शकते, त्यामुळे तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

हार्ट अटॅकची इतर शारीरिक लक्षणे कोणती?

हार्ट अटॅकमध्ये उलटी, मळमळ, डावा हात, पाठ, पोट किंवा जबड्यामध्ये वेदना पसरणे अशी लक्षणे दिसून येऊ शकतात.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Shirsat : सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचं वक्तव्य चर्चेत

Pune Crime : कॅफेमधील 'ते' फोटो व्हायरल करण्याची धमकी; ब्लॅकमेलिंगला कंटाळून २२ वर्षीय तरुणीची आत्महत्या

Maharashtra Live News Update : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, उभ्या ट्रकला दुसऱ्या ट्रकची मागून धडक, एक ठार

ना पाणी - ना जेवण, फक्त बिअर, बायकोसोबत डिव्होर्स अन् दुरावा सहन झाला नाही; शेवट झाला भयानक

Avika Gor: बालिका वधूचा 'आनंदी'चा हटके लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT