Anemia Affect Fertility Saam Tv
लाईफस्टाईल

Anemia Affect Fertility : अशक्तपणामुळे आई होण्यास अडचण? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

Anemia Affects Fertility In Women : बदलेली जीवनशैली, ताणतणाव व खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपल्याला अशक्तपणा येतो. आजकाल या समस्येला आपल्या प्रत्येकाला तोंड द्यावे लागते. अशक्तपणा ही अशी स्थिती आहे. ज्यामध्ये शरीरातील लाल रक्तपेशींची कमतरता तयार होते.

कोमल दामुद्रे

Anemia Side Effects :

बदलेली जीवनशैली, ताणतणाव व खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपल्याला अशक्तपणा येतो. आजकाल या समस्येला आपल्या प्रत्येकाला तोंड द्यावे लागते. अशक्तपणा ही अशी स्थिती आहे. ज्यामध्ये शरीरातील लाल रक्तपेशींची कमतरता तयार होते.

लाल रक्तपेशी शरीराच्या वेगवेगळ्या भागात ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करतात. त्यांच्या कमतरतेमुळे ऑक्सिजन शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचत नाही. अशक्तपणामुळे महिलांमध्ये (Women) वंध्यत्वाचा धोका निर्माण होतो का? जाणून घेऊया याविषयी तज्ज्ञांकडून

दिल्लीतील स्त्रीरोग विभाग, डायरेक्टर, डॉ. अर्चना पाठक म्हणतात की, अशक्तपणा ही अशी एक स्थिती आहे ज्यामध्ये लाल रक्तपेशी किंवा रक्त कमी झाल्यावर महिलांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. रक्त हे पुनरुत्पादक अवयवांसह पेशींमध्ये ऑक्सिजन वाहून नेण्याचे कार्य करते. ऑक्सिजनच्या कमरतेमुळे गर्भधारणेच्या समस्येवर परिणाम होतो.

अशक्तपणामुळे स्रियांमध्ये मासिक पाळीचे चक्र विस्कळीत होऊ शकते. लाल रक्तपेशी कमी झाल्याने महिलांना मासिक पाळी येण्याची समस्या देखील होऊ शकते. यामुळे गर्भधारणेची शक्यता कमी होते. अशक्तपणामुळे प्रजनन क्षमता आणि गर्भधारणेध्ये अनेत समस्या निर्माण होतात. ऑक्सिजन प्रत्येक अवयवापर्यंत योग्य प्रकारे पोहोचत नसल्यामुळे, एखाद्या व्यक्तीला उर्जेची कमतरता आणि थकवा जाणवू शकतो.

अशक्तपणामुळे बाळ वेळेआधीच जन्माला देखील येते किंवा जन्मलेल्या बाळाचे वजन कमी होते. ज्यामुळे आई आणि मुल दोघांच्या आरोग्यावर दीर्घकाळ परिणाम होतो. त्यामुळे अशक्तपणावर मात करण्यासाठी निरोगी आहार (Food), आयर्न सप्लिमेंट्स आणि औषधे (Medicine) यांच्या मदतीने हा आजार बरा होऊ शकतो. यासाठी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert: पुढचे २४ तास महत्त्वाचे! मुंबई, ठाणे, रायगडला रेड अलर्ट; गरज असेल तरच बाहेर पडा

School Holiday Today: पावसाची जोरदार बॅटिंग; मुंबई, ठाण्यासह 'या' ठिकाणी शाळांना सुट्टी; वाचा सविस्तर

Horoscope: घरात येईल सुख-समृद्धि; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरेल लाभकारी, जाणून घ्या राशीभविष्य

Rajyog 2025: गजकेसरी आणि कलात्मक राजयोगामुळे फळफळणार 'या' राशींचं नशीब; उत्पन्नाचे नवे मार्ग होणार खुले

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

SCROLL FOR NEXT