Auto News : छतपूर मध्यप्रदेश जिल्ह्यातील एका तरुणाने सर्व सामान्यांसाठी इलेक्ट्रिक सायकल बनवली आहे. भारतीय बाजारपेठेत, जिथे इलेक्ट्रिक सायकलची किंमत परवडणारी नसली तरी ३०,००० रुपयांपासून सुरू होऊन ६०,००० रुपयांच्या वर जाते, तिथे इलेक्ट्रिक सायकल 20,000 रुपयांना मिळत असेल, तर ती खरेतर आश्चर्याची गोष्ट आहे.
मध्य प्रदेशातील छतरपूर येथील एका 20 वर्षीय तरुणाने अशी बाइक (Bike) डिझाइन केली आहे. जी कामगिरी आणि वैशिष्ट्यांच्या बाबतीत मोठ्या ब्रँडला टक्कर देऊ शकते.
1. फीचर्स
ही इलेक्ट्रिक सायकल आदित्य शिवहरे यांनी बनवली असून एक क्विंटलपर्यंत भार वाहून नेण्याची क्षमता आहे असे त्याने सांगितले. विशेष बाब म्हणजे ही इलेक्ट्रिक सायकल एकदा चार्ज केल्यानंतर 30 किलोमीटरपर्यंतचे अंतर कापू शकते.
पेट्रोलच्या (Petrol) सततच्या वाढत्या किमती आणि पर्यावरणीय प्रदूषणाच्या समस्या लक्षात घेऊन त्याने एक महिन्याच्या अथक परिश्रमानंतर ही इलेक्ट्रिक सायकल तयार केल्याचे त्याने सांगितले आहे. ही सायकल बनवण्यासाठी त्यांनी सुमारे 20 हजार रुपये (Price) खर्च केले आहेत. तर ही सायकल चालवण्यासाठी प्रति किलोमीटर 10 पैसे खर्च येतो, असेही सांगण्यात आले.
अतिशय आकर्षक दिसणारी ही सायकल वेगळ्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न आदित्यने केला आहे. या सायकलला ब्रेक, क्लच, अॅक्सिलरेटर देखील आहे. आदित्य हा शास्त्रज्ञ थॉमस एडिसन यांना आपला आदर्श मानतो. तो कॉलेजला असल्यापासून तो विज्ञानाचे नवे प्रयोग करत आहे. त्याने अनेक महिन्यांच्या संघर्षानंतर त्याने वायरलेस वीज बनवली. या उपकरणात तरंगांच्या माध्यमातून विद्युत प्रवाह येतो. या शोधासाठी स्थानिक स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत त्यांचा गौरव करण्यात आला आहे. परंतु, त्याच्या कंपनीची नोंदणीही झाली असून त्याचे पेटंट अजून व्हायचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.