AMRAVATI DOCTOR DEATH saam tv
लाईफस्टाईल

गोरं होणं जीवावर बेतलं? औषधाच्या ओव्हरडोसनं डॉक्टरचा घात?

Doctor Dies in Amravati: सौंदर्य वाढवण्यासाठी तरुण- तरूणी नको ते उपाय करतात आणि जीव गमावून बसतात. असाच प्रकार अमरावतीत समोर आलाय. गोरं होण्याची हौस एका डॉक्टरच्या जीवावर बेतलीय. नेमकं काय केलं या तरुण डॉक्टरनं ? कशामुळे या डॉक्टरला जीव गमवावा लागला? पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...

Rohit Kadam

सौंदर्य मिळवण्यासाठी तरुणाई कोणत्या थराला जाईल, याचा काही नेम नाहीये. चेहऱ्यावरील डाग लपवण्यासाठी आणि गोरं दिसण्याच्या मोहापायी एका डॉक्टरचा जीव गेल्याचा संशय व्यक्त केला जातोय. आदित्य रावतेनं नाशिक येथून BAMS पदवी पूर्ण केली होती. त्यानंतर अमरावतीतील एका नामांकित रुग्णालयात इंटर्न डॉक्टर म्हणून आदित्य कार्यरत होता. नेहमीप्रमाणे रात्री कुटुंबासोबत जेवण केल्यानंतर आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेला. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी बराच वेळ झाला तरी आदित्य खोलीबाहेर आला नाही. कुटुंबीयांनी दरवाजा उघडला त्यावेळी आदित्य मृतावस्थेत आढळून आला.

मात्र तो गोरं होण्यासाठी इंजेक्शन आणि औषध घेत असल्याची धक्कादायक माहिती आदित्यच्या आई-वडिलांनी दिलीय.

गोरं होणं डॉक्टरच्या जीवावर बेतलं?

गोरं होण्यासाठी 2-3 महिन्यांतून एकदा इंजेक्शन घ्यायचा

सुरूवातीला चांगला रिजल्ट आला होता

सलाईनमधून घेतलेल्या इंजेक्शनचा ओव्हरडोस झाल्यानं साईट इफेक्ट

ओव्हरडोसमुळे हिरवं-निळं शरीर पडलं, दातखीळ बसली

तरुण शरीर सौष्ठवासाठी सर्रास नको ते सप्लिमेंटस घेत असतात. त्यामुळे अनेकदा तरुणांचे जीव गेल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता गोरं होण्याच्या नादात जीव गमावल्याची घटना समोर आलीय. शवविच्छेदनानंतर आदित्यच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईलच. मात्र स्वत: डॉक्टर असलेला तरुणही अशा घातक उपायांच्या मागे धावत असतील तर ही अधिक चिंतेची बाब आहे. त्यामुळे तुम्हीदेखील झटपट सौंदर्याचा हव्यास असेल तर आता सावध व्हा... आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही उपाय करू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'काव काव केल्याने कोणी कोयल होत नाही'; ठोंबरेंना सारंग यांचं प्रत्युत्तर, जागावाटपावरून राष्ट्रवादीत वाद चिघळला

काँग्रेस उद्या देशभरात 'काळा दिवस' पाळणार, इंडिया आघाडीचं दिल्लीत उद्या पुन्हा आंदोलन?

सकाळ करंडक : आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत तरुणाईचा नाट्याविष्कार, स्पर्धेचे वेळापत्रक वाचा

भाजपनं ८० च्या दशकातील अभिनेत्याला दिली महत्त्वाची जबाबदारी; सुपरस्टारला मिळाला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा

वय वाढलं की राजकारणी वेड्यासारखं करतात; इंदुरीकर महाराजांच्या विधानानं वाद

SCROLL FOR NEXT