Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर देते 'हा' पहिला भयंकर संकेत, ९९% लोकांना माहीतच नसते हे गुप्त लक्षण

Shreya Maskar

सामान्य सुरुवातीचे लक्षण

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, बहुतेक लोकांसाठी हृदयविकाराचा झटका आल्याचे पहिले लक्षण म्हणजे छातीत अस्वस्थता जाणवणे. छातीच्या मध्यभागी मंद वेदना होणे किंवा छाती भरल्यासारखे वाटणे.

Common initial symptoms | pinterest

हृदयविकाराचा झटका

हृदयविकाराचा झटका फक्त छातीवरच परिणाम करतो, असे नाही. हृदयविकाराच्या झटक्याची पहिली लक्षणे शरीराच्या इतर भागांतही जाणवू शकतात.

A heart attack | pinterest

शरीरातील वेदना

डाव्यात हातात अस्वस्थता जाणवू शकते. जबडा आणि मान यांच्यात वेदना होतात. पाठ विशेषतः खांद्याच्या हाडांच्या दरम्यान अस्वस्थता वाटणे, वेदना जाणवणे.

Body pain | pinterest

सायलेंट लक्षणे

महिला, वृद्ध व्यक्ती आणि मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये असामान्य लक्षणे दिसण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे ती वेळीच ओळखणे गरजेचे असते.

diabetes | pinterest

अचानक येणारा प्रचंड थकवा

तुम्हाला काही काम, हालचाल न करता अचानक थकवा जाणवतो. तुम्ही अस्वस्थ होता. कोणतीही शारीरिक हालचाल न करता श्वास घेण्यास त्रास होतो.

Sudden extreme fatigue | pinterest

मळमळणे

पोटात मळमळते आणि अंगावर थंड घाम येतो, अनेकदा आपण याला फ्लू किंवा फूड पॉयझनिंग समजण्याची चूक करतो.

nausea | pinterest

कंबरेच्या वरच्या भागात वेदना

कंबरेच्या वरच्या भागात वेदना हे देखील हार्ट अटॅकचे गुप्त लक्षण आहे. अनेक दिवस या वेदना अशाच राहील्या तर डॉक्टरांचा सल्ला लगेच घ्या.

Pain in upper back | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : शरीर बारीक पण पोट सुटलेले? सावधान! यामागे असू शकतात 'ही' ५ गंभीर कारणे

Thin Body Fat | AI PHOTO
येथे क्लिक करा...