Shreya Maskar
अनेक लोकांचे शरीर बारीक असते, हात-पाय सडपातळ असतात; मात्र पोटाचा घेर वाढलेला दिसतो. याला सामान्यतः Skinny Fat असे म्हटले जाते.
शरीराच्या इतर भागांच्या तुलनेत पोटाभोवती चरबी अधिक जमा होऊ शकते. ही चरबी जास्त असल्यास मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
दिवसभर खुर्चीवर बसून काम करणे, चालणे कमी असणे आणि नियमित शारीरिक हालचाल न करणे यामुळे पोटाभोवती चरबी वाढण्याची शक्यता असते.
आहारात पुरेशी प्रथिने नसणे आणि ताकदीचे व्यायाम न करणे यामुळे स्नायूंचे प्रमाण कमी राहू शकते. अशा वेळी शरीर सडपातळ दिसले तरी पोटाचा आकार अधिक जाणवू शकतो.
काही वेळा पोट सुटल्यासारखे दिसण्यामागे चरबी नसून गॅस, बद्धकोष्ठता किंवा पचनाशी संबंधित समस्या असतात. जेवणानंतर पोट जास्त फुगणे आणि सकाळी तुलनेने सपाट दिसणे, ही पोट फुगण्याची लक्षणे आहेत.
सतत गोड पदार्थ, बिस्किटे, बेकरी पदार्थ, तळलेले पदार्थ आणि साखरयुक्त पेये घेणे यामुळे गरजेपेक्षा जास्त कॅलरी शरीरात जाऊ शकतात. त्यामुळे वजन फारसे न वाढताही पोटाभोवती चरबी वाढू शकते.
सतत कमी झोप घेणे आणि दीर्घकाळ मानसिक तणावात राहणे यांचा भूक, खाण्याच्या सवयी आणि शरीरातील चरबीच्या वितरणावर परिणाम होऊ शकतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.