Heart Health : हृदयाचे ठोके अचानक वाढतात अन् पुन्हा कमी होतात? दुर्लक्ष करू नका, 'या' गंभीर आजाराचे आहेत संकेत

Shreya Maskar

अनियमित हृदयाचे ठोके

हृदयाचे ठोके अचानक वेगाने वाढणे, ठोका चुकल्यासारखे वाटणे किंवा हृदय अनियमितपणे धडधडणे याला हार्ट पॅल्पिटेशन्स (Heart Palpitations) असे म्हणतात. हृदयाच्या ठोक्यांच्या लयीत प्रत्यक्ष बिघाड असल्यास त्याला ॲरिदमिया (Arrhythmia) म्हणतात.

Irregular Heartbeat | pinterest

ॲरिदमिया

हृदयाच्या विद्युत संकेतांमध्ये बिघाड झाल्यास ठोके अनियमित, खूप वेगवान किंवा खूप मंद होऊ शकतात. धडधड, चक्कर किंवा अशक्तपणा जाणवू शकतो.

Arrhythmia | pinterest

ॲट्रियल फिब्रिलेशन

हृदयाच्या वरच्या कप्प्यांमध्ये अनियमित विद्युत क्रिया झाल्याने ठोके अनियमित होतात. काहींना धडधड, दम लागणे किंवा थकवा जाणवतो. या स्थितीमुळे स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.

Atrial Fibrillation | pinterest

थायरॉईड

थायरॉईड हार्मोन्स जास्त प्रमाणात तयार झाल्यास हृदयाचे ठोके वाढू शकतात. वजन कमी होणे, घाम येणे, हात थरथरणे आणि अस्वस्थता अशी लक्षणेही दिसू शकतात.

Thyroid | pinterest

हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे आजार

हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्यास, विशेषतः कोरोनरी आर्टरी डिसीजमध्ये, छातीत दडपण, दम लागणे आणि धडधड जाणवू शकते.

Coronary Artery Disease | pinterest

ॲनिमिया

हिमोग्लोबिन कमी झाल्यास शरीराला पुरेसा ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी हृदयाला अधिक वेगाने काम करावे लागू शकते. थकवा, फिकटपणा आणि दम लागणे ही इतर लक्षणे असू शकतात.

Anemia | pinterest

हार्ट फेल्युअर

हृदयाची पंप करण्याची क्षमता कमी झाल्यास किंवा हृदयाच्या स्नायूंमध्ये बदल झाल्यास धडधड, दम लागणे, थकवा आणि पायांना सूज येणे अशी लक्षणे दिसू शकतात.

Heart Failure | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : कानात सतत येतोय शिट्टीसारखा आवाज? दुर्लक्ष करू नका, शरीर देतंय 'या' गंभीर आजाराचे संकेत

Tinnitus | AI PHOTO
येथे क्लिक करा...