Amla Benefits for Blood Sugar Control google
लाईफस्टाईल

Blood Sugar Control: आवळा ठेवेल ब्लड शुगर नियंत्रणात, वेळीच जाणून घ्या संपूर्ण फायदे; अमेरिकेच्या तज्ज्ञांनी दिली माहिती

Amla Benefits: आवळा रक्तातील साखर नियंत्रण, हृदयाचे आरोग्य, पचन सुधारणा आणि त्वचा-केसांसाठी फायदेशीर आहे. तज्ज्ञांच्या मते रोज आवळा खाल्ल्याने शरीरावर सकारात्मक परिणाम दिसतात.

Sakshi Sunil Jadhav

आवळा हे एक सुपरफूड आहे. त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. आपल्याला कधीतरी काही आबंट खायचा चव आली की, घरात आपण आवळे घेऊन येतो. काहीलोक आवळ्याचे खूप वेगवेगळे पदार्थ बनवतात. अनेकांना याचे फायदे माहितच नाहीत. तुम्हाला होणाऱ्या काही गंभीर आजारांवर हे एक खूप फायदेशीर मानलं जातं. पुढे आपण याचा वापर कोणकोणत्या आजारांसाठी करु शकतो हे जाणून घेणार आहोत.

प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. शुभम वात्स्य यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून पुढील महत्वाची माहिती आणि काही सल्ले दिले आहेत. आवळ्याला एक सुपरफूड म्हणतात. आवळ्यामध्ये असलेले नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स आणि भरपूर प्रमाणातील व्हिटॅमिन C शरीराच्या संपुर्ण आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. विशेषतः हार्टच्या रुग्णांसाठी आवळा महत्त्वाची भूमिका बजावतो. तो LDL म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉलचे ऑक्सिडेशन कमी करतो, त्यामुळे रक्तवाहिन्या निरोगी राहतात.

आवळा पचनसंस्थेसाठीही खूप फायदेशीर असतो. याने आतड्यांचा त्रास कमी होतो आणि पित्ताचा प्रवाह सुधारतो. त्यामुळे अ‍ॅसिडिटी, पोटात जडपणा आणि मंद पचनासारख्या तक्रारी कमी होण्यास मदत होते. तसेच आवळा कार्बोहायड्रेट्सचं शोषण कमी करतो. त्याने जेवणानंतर अचानक वाढणारी साखर कमी होते आणि रक्तातील साखरेचे नियंत्रण होतं.

तसेच आवळ्यातील व्हिटॅमिन C कोलेजनचं संतुलन राखतं. त्यामुळे हिवाळ्यात होणारा त्वचेचा कोरडेपणा, सांधेदुखी, केसांची कमजोरी यासारख्या समस्या कमी होतात. आवळा बऱ्याचदा आपण दुर्लक्षित करतो, पण तो रोगप्रतिकारक शक्ती, हृदय, पचन, रक्तातील साखर आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. रोज एक ते दोन आवळे खाल्ल्याने तुम्हाला १ ते २ दिवसात शरीरात चांगले बदल जाणवायला लागतील.

टीप : हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahi paneer Recipe: घरच्या घरी बनवा स्वादिष्ट शाही पनीर; पाहुण्यांनाही आवडेल खास रेसिपी

दिवसाढवळ्या शिंदे गटाच्या बड्या नेत्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Dombivli Crime: डोंबिवली हादरली! तरुणाकडून शेजारच्याची हत्या, घरात घुसून चाकूने सपासप वार करत संपवलं

Birds Predict Monsoon: चातकचं नव्हे आपल्या आजूबाजूला असणारे हे पक्षी देतात पावसाची चाहूल, कसं जाणून घ्याल

Maharashtra News Live Update: पुण्यातील सारसबाग पुढील २ दिवस राहणार बंद

SCROLL FOR NEXT