Amazon Prime Lite Saam Tv
लाईफस्टाईल

Amazon Prime Lite : आता कमी खर्चात या OTT प्लॅटफॉर्मची मजा, पाहा प्राइम लाइटचे वार्षिक सब्सक्रिप्शन

Amazon Prime : अ‍ॅमेझॉननं भारतात आपल्या प्राइम सर्व्हिसची एक नवीन आणि स्वस्त मेंबरशिप सुरु केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Amazon Prime Lite Subscription : अ‍ॅमेझॉननं भारतात आपल्या प्राइम सर्व्हिसची एक नवीन आणि स्वस्त मेंबरशिप सुरु केली आहे. जिला अ‍ॅमेझॉन प्राइम लाइट असं नाव देण्यात आलं आहे आणि ही सर्व्हिस पहिल्यांदा यावर्षीच्या सुरुवातीला निवडक ग्राहकांसाठी उपलब्ध झाली होती. तसेच अ‍ॅमेझॉन प्राइम लाइटमध्ये प्राइम सारखे लाभ मिळतात. चला जाणून घेऊया ह्या नवीन मेंबरिशपची किंमत आणि बेनिफिट्स.

अ‍ॅमेझॉन प्राइम लाइट सब्सक्रिप्शनची किंमत

ई-कॉमर्स कंपनी Amazon ने आपला नवीन वार्षिक सदस्यत्व सदस्यता योजना 'Amazon Prime Lite' लाँच केली आहे. नवीन Amazon Prime Lite मेंबरशिप प्लॅनची ​​किंमत 999 रुपये आहे. या प्लॅनची ​​किंमत नियमित प्राइम मेंबरशिप प्लॅनच्या किमतीपेक्षा 500 रुपये कमी आहे.

नियमित प्राइम मेंबरशिप प्लॅनची (Plan) ​​किंमत 1499 रुपये आहे. तसेच अ‍ॅमेझॉन प्राइम प्रमाणे लाइट व्हर्जनचे मंथली किंवा क्वार्टरली प्लॅन्स सादर करण्यात आले नाहीत. तुम्ही अ‍ॅमेझॉनच्या वेबसाइट मोबाइल किंवा Android आणि iOS अ‍ॅपच्या माध्यमातून प्राइम लाइट मेंबरशिपसाठी साइन अप करू शकता.

अ‍ॅमेझॉन प्राइम लाइट फायदे -

अ‍ॅमेझॉन प्राइम लाइट सदस्यांना मोफत दोन दिवसांत डिलिव्हरी आणि स्टँडर्ड डिलिव्हरी मिळेल, ज्यासाठी किमान ऑडर्रचा नियम (Rules) लागू नसेल. ह्यात मोफत नो-रश शिपिंग आणि 25 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळेल. तसेच सकाळी डिलिव्हरी घेण्याचा ऑफ्शन आहे परंतु 175 रुपये प्रति वस्तू द्यावे लागतील.

  • अ‍ॅमेझॉन प्राइम लाइट सदस्य ज्यांच्याकडे अ‍ॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड आहे त्यांना ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरच्या खरेदीवर 5 टक्के कॅशबॅक मिळू शकतो.

  • ह्यात डिजिटल आणि गिफ्ट कार्ड खरेदीचा खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध नाही कारण त्यावर आधीच रिवर्ड्स आणि 2 टक्के कॅशबॅक दिला जातो.

  • अ‍ॅमेझॉन प्राइम प्रमाणे, लाइट सदस्यत्व देखील तुम्हाला प्राइम व्हिडीओचा अ‍ॅक्सेस देतं. तुम्ही प्राइम व्हिडीओवर उपलब्ध असलेला कोणताही कंटेंट एचडी मध्ये आणि दोन डिवाइसवर जाहिरातींसह पाहू शकता.

  • अ‍ॅमेझॉन प्राइम लाइटच्या सदस्यांना लाइटनिंग डील्स, एक्सक्लूसिव्ह लाइटनिंग डील्स आणि डील्स ऑफ डेचा अर्ली अ‍ॅक्सेस मिळेल.

लाइट प्राइम आणि अ‍ॅमेझॉन प्राइममधील फरक

प्राइमच्या तुलनेत लाइट (Lite) व्हर्जनमध्ये कमी बेनिफिट्स आहेत आणि त्यामुळे ह्याची किंमत कमी आहे. फरक पाहता, वन डे डिलिव्हरी, सेम डे डिलिव्हरी, प्राइम रीडिंग कॅटलॉगचा अ‍ॅक्सेस, प्राइम म्यूजिक आणि जाहिराती न पाहता प्राइम व्हिडीओचा समावेश आहे. लाइटमध्ये ‘प्राइम अ‍ॅडवांटेज’ देखील मिळत नाही त्यामुळे तुम्हाला नो कॉस्ट ईएमआय ऑप्शन आणि सहा महिन्याची फ्री स्क्रीन रिप्लेसमेंटची सुविधा मिळत नाही. तसेच अ‍ॅमेझॉन प्राइम मध्ये फ्री इन-गेम कंटेंट आणि अ‍ॅमेझॉन फॅमिली देखील मिळते.

प्राइम अॅडव्हांटेज बेनिफिट्समध्ये कोणत्या सेवा उपलब्ध आहेत?

प्राइम अॅडव्हांटेज फायद्यांपैकी, ग्राहकांना स्मार्टफोनच्या खरेदीवर विनाखर्च EMI आणि निवडक उपकरणांवर 6 महिन्यांसाठी मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट लाभ मिळतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : हायफाय राहणं, फाडफाड इंग्लिश, क्रिकेटरची बायको, एकेकाळी स्वतःची विमान कंपनी; भीक मागण्याची वेळ, VIDEO व्हायरल

पुणेकरांचा प्रवास होणार गारेगार; इलेक्ट्रिक डबल डेकर बस लवकरच सेवेत, कोणत्या मार्गांवर धावणार जाणून घ्या

Maharashtra Live News Update: वर्धेच्या देवळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा

Bhel Recipe: तोंडाला पाणी सुटलं ना? मग आजच बनवा ही चटपटीत 'ओली भेळ'

Moti jewellery Designs: अस्सल पारंपारिक सौंदर्य येईल खुलून, मोत्यांच्या दागिन्यांचे 6 ट्रेडिंग आणि युनिक पॅटर्न

SCROLL FOR NEXT