Redmi 10 Power  Saam Tv
लाईफस्टाईल

Amazon ची जबरदस्त डील; Redmi चा 19,000 हजारांचा स्मार्टफोन 10,000 हजारात खरेदी करण्याची संधी

Redmi 10 Power: Amazon ची जबरदस्त डील; Redmi चा 19,000 हजारांचा स्मार्टफोन 10,000 हजारात खरेदी करण्याची संधी

Satish Kengar

Amazon Kickstarter Deals:

तुम्हाला जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर Amazon ची ही डील तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते आहे. Amazon च्या Kickstarter डील अंतर्गत Redmi चा फोन Redmi 10 Power वर मोठी सूट मिळत आहे.

Amazon हा फोन 41 टक्के डिस्काउंटसह विकत आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बँकेच्या सवलतीचा लाभ घेऊन 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत हा फोन खरेदी करू शकता. या फोनची खास गोष्ट म्हणजे याचा 50MP कॅमेरा, 8GB RAM, 6000mAh बॅटरी. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

तुम्ही Amazon वरून Redmi 10 Power (8GB RAM, 128GB) ऑर्डर करू शकता. या स्मार्टफोनची एमआरपी 18,999 रुपये आहे. तुम्ही हा फोन Amazon च्या Kickstarter डीलमध्ये 41 टक्क्यांच्या डिस्काउंटसह फक्त 11,248 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. (Latest Marathi News)

याशिवाय तुम्हाला यावर अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत. SBI क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यावर तुम्हाला 1250 रुपयांची सूट मिळेल. याशिवाय तुम्हाला अनेक ऑफर्सही मिळणार आहेत. जर तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती ठीक असेल तर तुम्ही तो Amazon वर एक्सचेंज करू शकता. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला 10,600 रुपयांची सूट मिळू शकते.

स्पेसिफिकेशन

Xiaomi Redmi सीरीजच्या या स्मार्टफोनमध्ये मोठा 6.71 इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. यात Android 13 वर आधारित MIUI 14 सॉफ्टवेअर स्किन आहे. जबरदस्त परफॉर्मन्ससाठी यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 50MP+2MP प्रायमरी कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा आहे. Redmi 10 Power ची 6000mAh बॅटरी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

महत्वाचं: ही बातमी ई-कॉमर्स वेबसाइट्सवर दिलेल्या एक्सचेंज ऑफर आणि डिस्काउंट ऑफरच्या आधारे तयार करण्यात आली आहे. एक्सचेंज ऑफर तुमच्या जुन्या फोनच्या कंडिशनवर आधारित आहे. अशा परिस्थितीत कोणताही फोन खरेदी करण्यापूर्वी त्याची किंमत नक्कीच तपासा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra News Live Update: Mumbai: पवई पोलिसांची अवैध डिझेल साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई.

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT