Amazon Great Indian Festival सेलमध्ये अनेक महागडे स्मार्टफोन मोठ्या सवलतीत उपलब्ध आहेत. सॅमसंगचा फ्लॅगशिप फोन ऑफरनंतर सर्वात कमी किमतीत सेलमध्ये उपलब्ध आहे. आम्ही Samsung Galaxy S22 Ultra 5G बद्दल बोलत आहोत.
Amazon ने फोनवर ऑफर्सचा वर्षाव केला आहे, ज्यामुळे हा फोन आता लोकांच्या बजेटमध्ये आला आहे. 10,000 रुपयांची बँक ऑफर फोनवर उपलब्ध आहे. एवढेच नाही तर फोनवर एक जबरदस्त एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे, ज्यामुळे फोनची किंमत खूपच कमी झाली आहे. येथे आम्ही तुम्हाला सॅमसंग गॅलेक्सी S22 अल्ट्रा 5G च्या Phantom Black, 12GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटवर उपलब्ध असलेल्या ऑफरबद्दल सांगत आहोत. सविस्तर माहिती जाणून घेऊ... ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
1.32 लाख रुपयांचा फोन 25 हजार रुपयांना मिळत आहे.
Amazon सेलमध्ये 1,31,999 रुपये किंमत असलेला फोन 84,999 मध्ये उपलब्ध आहे, म्हणजेच हा फोन 29,000 हजारच्या फ्लॅट डिस्काउंटसह उपलब्ध आहे. पण फोनवर उपलब्ध असलेल्या ऑफर्सचा फायदा घेऊन तुम्ही त्याची किंमत आणखी कमी करू शकता. बँक ऑफरचा (SBI क्रेडिट कार्ड Txn) लाभ घेऊन, तुम्ही फोनवर 10,000 रुपयांची सवलत मिळवू शकता. (Latest Marathi News)
Amazon फोनवर 50,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील देत आहे. समजा, जर तुम्हाला दोन्ही ऑफरचा पुरेपूर लाभ मिळाला, तर फोनची किंमत 24,999 रुपये होईल. परंतु लक्षात ठेवा की एक्सचेंज बोनसची रक्कम जुन्या फोनची स्थिती, मॉडेल आणि ब्रँड यावर अवलंबून असेल. सॅमसंगच्या अधिकृत साइटवर, सॅमसंग गॅलेक्सी S22 अल्ट्रा 5G चे Phantom Black, 12GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट 1,09,999 रुपयांना उपलब्ध आहे.
Samsung Galaxy S22 Ultra चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
Samsung Galaxy S22 Ultra स्मार्टफोन 5G सपोर्टसह येतो. यात 6.8 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 1700 nits च्या पीक ब्राइटनेस लेव्हलला सपोर्ट करतो. HDR10+ सह या फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस+ संरक्षण देखील आहे. फोन 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. फोन Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज आहे.
फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 108 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे, तसेच 10 मेगापिक्सेल + 12 मेगापिक्सेल + 10 मेगापिक्सेलचे तीन इतर कॅमेरे आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 40 मेगापिक्सेल लेन्स आहे. फोन इन-बिल्ट स्पेन सपोर्टसह येतो. फोनमध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी आहे. याशिवाय, फोनमध्ये 25W वायरलेस आणि 10W रिव्हर्स चार्जिंगसाठी देखील स्पोर्ट आहे. फोनमध्ये चार्जिंगसाठी USB Type-C पोर्ट देण्यात आलं आहे.
डिस्क्लेमर: आम्ही ही बातमी ई-कॉमर्स वेबसाइट्सवर दिलेल्या एक्सचेंज ऑफर आणि सवलतींच्या आधारे तयार केली आहे. एक्सचेंज ऑफर गॅझेटच्या स्थितीवर अवलंबून असतात. अशा परिस्थितीत, कोणतेही गॅझेट खरेदी करण्यापूर्वी, त्याची किंमत निश्चितपणे तपासा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.