आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकालाच घाई आहे. यातच कार कंपन्यांनी आपल्या ग्राहकांचा वेळ वाचवण्यासाठी एक जबरदस्त उपाय शोधला आहे. Kia Motors ची एक अशी कार आहे , जी अवघ्या 18 मिनिटत चार्ज होते, असा कंपनीचा दावा आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार 708 किमी पर्यंत धावते. यात ड्युअल कव्हर 12.3-इंचाचा डिस्प्ले मिळतो, ज्यामुळे ती एलिट आणि हाय क्लास कारच्या रेंजमध्ये येते.
Kia ची ही सुपर स्मार्ट कार 350 kW DC फास्ट चार्जरने अवघ्या 18 मिनिटात 80 टक्के चार्ज होते. कारमध्ये सिंगल आणि ड्युअल बॅटरी पॅकचा पर्याय आहे. ही पॉवरफुल इलेक्ट्रिक कार 60.95 लाख रुपये एक्स-शोरूमच्या प्रारंभिक किंमतीत उपलब्ध आहे. या कारमध्ये 14-स्पीकर मेरिडियन साउंड सिस्टम देण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Kia EV6 धावताना जास्तीत जास्त 605 Nm टॉर्क जनरेट करते. यामध्ये GT Line RWD आणि GT Line AWD असे दोन प्रकार दिले आहेत. कंपनीच्या एसयूव्ही सेगमेंटची ही मोठ्या आकाराची कार आहे. यात इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC) आहे. ज्यामुळे कारला वळणावर अपघात होण्याची शक्यता कमी होते. (Latest Marathi News)
ही स्टायलिश कार बाजारात ह्युंदाई आयोनिक 5, स्कोडा एनियाक iV, BMW i4 आणि Volvo XC40 शी स्पर्धा करते. ही कंपनीची 5 सीटर कार आहे. ज्याचा बॅटरी पॅक 77.4kWh आहे. कारला Advanced Driver Assist System (ADAS) मिळते, जी एखादी व्यक्ती किंवा दुसरे वाहन कारच्या खूप जवळ अस,ते तेव्हा अलर्ट जारी करते.
कारमध्ये वायरलेस फोन चार्जिंग आणि 325 पीएस पॉवर आहे. यात ड्युअल क्लायमेट कंट्रोलचा पर्यायही आहे. ही कार 50kW DC फास्ट चार्जरने 73 मिनिटांत 80 टक्के चार्ज होते. ही कार होम सॉकेटमधून 36 तासांत चार्ज होते. या कारमध्ये क्रूझ कंट्रोल, लेन किप असिस्ट हे फीचर देखील आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.