JioBook 11 Amazon offer Saam Tv
लाईफस्टाईल

Amazon ची खास ऑफर; 25,000 रुपयांचा लॅपटॉप अवघ्या 14,499 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी

Satish Kengar

JioBook 11 Amazon offer:

जर तुम्ही नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Jio चा नवीन लॅपटॉप Amazon Great Indian Festival सेलमध्ये बंपर डिस्काउंटसह 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे.

Jio ने ऑगस्टमध्ये JioBook 11 लॅपटॉप लॉन्च केला होता. ज्याबद्दल जिओचा दावा आहे की, हा बेसिक काम करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी योग्य आहे. लॉन्चच्या वेळी Jio ने सांगितले होते की, JioBook 11 5 ऑगस्ट 2023 पासून भारतात उपलब्ध होईल. यावरच आता मोठी सवलत मिळत आहे. नेमकी काय आहे ऑफर याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

JioBook 11 (2023) लॅपटॉपची किंमत 25,000 रुपये आहे. परंतु Amazon Great Indian Festival 2023 सेलमध्ये उपलब्ध असलेल्या विशेष ऑफर अंतर्गत, JioBook केवळ 14,499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. JioMart वर देखील हा लॅपटॉपत त्याच किंमतीत उपलब्ध आहे. (Latest Marathi News)

याशिवाय डील आणखी आकर्षक करण्यासाठी लॅपटॉपवर नो कॉस्ट ईएमआय, बँक डिस्काउंट यांसारख्या इतर ऑफर देखील उपलब्ध आहेत. म्हणजेच सध्या लॅपटॉप किंमतीपेक्षा 10,501 रुपयांनी कमी किमतीत उपलब्ध आहे. Amazon यावर 10,150 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही देत ​​आहे.

JioBook 11 (2023) फीचर्स

या लॅपटॉपचे वजन फक्त 990 ग्रॅम आहे आणि तो JioOS वर चालतो. हा लॅपटॉप फक्त ब्लू कलर पर्यायात येतो. JioBook 11 लॅपटॉपमध्ये 4GB रॅम, 64GB स्टोरेज आहे, जे 256GB पर्यंत वाढवता येऊ शकते. हे MediaTek MT8788 Octa Core 2.0 GHz ARM V8-A 64-बिट प्रोसेसरने सुसज्ज आहे. याची बॅटरी 8 तास चालते, असा कंपनीचा दावा आहे. यात 4G LTE आणि Wi-Fi साठी सपोर्ट आहे. यात वायरलेस स्कॅनिंग आणि प्रिंटिंगसाठीही सपोर्ट आहे.

लॅपटॉपमध्ये 11.6-इंचाचा अँटी-ग्लेअर HD डिस्प्ले, 2-मेगापिक्सेल HD वेबकॅम आणि स्टिरीओ स्पीकर देखील आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी यात दोन यूएसबी पोर्ट देखील आहेत. JioBook निवडणाऱ्या ग्राहकांना डिजीबॉक्स सोबत 100GB क्लाउड स्टोरेज कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय मिळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

PM Vishwakarma Yojana: वर्षभरात ६ लाख लाभार्थी, २ कोटींपेक्षा जास्त लोकांनी केलेय रजिस्ट्रेशन, योजनेचा कसा घ्याल लाभ?

SCROLL FOR NEXT