Amazon-Flipkart OnePlus Pad Go Sale Saam Tv
लाईफस्टाईल

Amazon-Flipkart Sale: 11.35 इंचाचा डिस्प्ले, 8GB रॅम, 256GB स्टोरेज; OnePlus च्या Tablet वर मिळत आहे जबरदस्त सूट

Satish Kengar

Amazon-Flipkart OnePlus Pad Go Sale:

प्रसिद्ध चीनी टेक कंपनी OnePlus ने अलीकडेच भारतीय बाजारात OnePlus Pad Go लॉन्च केला आहे. ज्याची विक्री आजपासून सुरू झाली आहे. कंपनीने वनप्लस पॅडचे परवडणारे मॉडेल म्हणून हा टॅबलेट आणला असून पहिल्याच सेलमध्ये यावर मोठी सूट दिली जात आहे. आजपासून सुरू झालेल्या सेलमध्ये ग्राहक हा Tablet ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून खरेदी करू शकतात.

OnePlus Pad Go ची भारतीय बाजारपेठेत 8GB + 128GB वायफाय मॉडेलची प्रारंभिक किंमत 19,999 रुपये ठेवण्यात आली आहे. याशिवाय ग्राहक 21,999 रुपयांमध्ये 8GB + 128GB LTE मॉडेल आणि 23,999 रुपयांमध्ये 8GB + 256GB LTE मॉडेल खरेदी करू शकतात.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ग्राहक हा टॅबलेट वनप्लस स्टोअर, अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर ऑनलाइन ऑर्डर करू शकतात. तसेच हा तुमच्या जवळपासच्या निवडक रिटेल स्टोअरमध्ये देखील उपलब्ध आहे.

3000 रुपयांपर्यंत मिळत आहे सूट

मर्यादित कालावधीच्या ऑफरसह ग्राहक 2000 रुपयांच्या सवलतीत OnePlus Pad Go टॅबलेट खरेदी करू शकतात. आयसीआयसीआय बँक कार्ड, एसबीआय कार्ड आणि वन कार्डच्या मदतीने पेमेंट केल्यास ही सूट दिली जात आहे. एवढेच नाही तर, जर ग्राहकांनी OnePlus Store वरून WiFi मॉडेल विकत घेतले तर त्यांना त्यावर 1000 रुपयांची अतिरिक्त कूपन सूट देखील मिळेल.

याशिवाय विद्यार्थ्यांना वायफाय मॉडेल्सच्या खरेदीवर 1000 रुपये आणि एलटीई मॉडेल्सच्या खरेदीवर 2000 रुपयांची सूट दिली जात आहे. याशिवाय रेड केबल क्लबच्या सदस्यांना कंपनीच्या वेबसाइटवरून हा टॅबलेट खरेदी केल्यास 1500 रुपयांपर्यंतचे फायदे दिले जात आहेत.  (Latest Marathi News)

OnePlus Pad Go स्पेसिफिकेशन

यात11.35 इंच 2.4K डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 400nits ब्राइटनेस, 90Hz रिफ्रेश रेट आणि 7:5 Aspect Ratio देते. यात सात 8GB रॅम आणि Helio G99 प्रोसेसर 256GB पर्यंत स्टोरेज आहे. Android 13 वर आधारित OxygenOS 13.2 सह येणाऱ्या टॅबलेटमध्ये 8MP प्रायमरी आणि 5MP सेल्फी कॅमेरा आहे. याची 8000mAh बॅटरी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT