Akshaya tritiya 2026 SAAM TV
लाईफस्टाईल

Akshaya tritiya 2026: अक्षय तृतीया 2026 ला गृहप्रवेश करणार? जाणून घ्या पूजा, मुहूर्त आणि पारंपरिक नियम

Griha pravesh muhurat: अक्षय तृतीया 2026 हा गृहप्रवेशासाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी केलेल्या पूजाविधी आणि पारंपरिक नियमांमुळे घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते. योग्य मुहूर्त आणि नियम जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

19 एप्रिल 2026 रोजी येणारी अक्षय तृतीया आहे. हा दिवस अनेकांसाठी नवं घर, नवी सुरुवात आणि समृद्धीची संधी घेऊन येणार आहे. हिंदू परंपरेनुसार अक्षय तृतीया हा ‘स्वयं सिद्ध मुहूर्त’ मानला जातो. म्हणजे या दिवशी कोणत्याही शुभ कामासाठी वेगळा मुहूर्त शोधण्याची गरज नसते. या दिवशी केलेलं प्रत्येक शुभ कार्य आयुष्यात सुख, संपत्ती, यश आणि सौभाग्य वाढवणारं ठरतं.

अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं, दागिने, गाडी किंवा घर खरेदी करणं शुभ मानलं जातं. त्याचप्रमाणे नवीन घरात प्रवेश केल्यास माता लक्ष्मीची कृपा कायम राहते, असंही मानण्यात येतं. त्यामुळे यंदा 19 एप्रिलला गृहप्रवेशाचा विचार करणाऱ्यांसाठी हा दिवस अधिक महत्त्वाचा ठरतोय.

अभिजित मुहूर्त कधी आहे?

गृहप्रवेशासाठी हा दिवस जरी चांगला मुहूर्त असला तरी ज्यांना विशिष्ट वेळ हवी असेल त्यांच्यासाठी सकाळी 11.55 ते दुपारी 12.46 या वेळेत ‘अभिजित मुहूर्त’ उपलब्ध आहे.

गृहप्रवेश करताना काही पारंपरिक नियम पाळणंही तितकेच गरजेचं मानलं जातं. नव्या घराच्या मुख्य दरवाजाला तोरण, फुले आणि रंगोळीने सजवणं शुभ मानलं जातं. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते, अशी श्रद्धा आहे.

वास्तुशांती

घरात प्रवेश करण्यापूर्वी वास्तुशांती, नवग्रह पूजा आणि हवन करणं आवश्यक आहे. ब्राह्मणाच्या हस्ते विधीपूर्वक पूजा झाल्यानंतरच घरात प्रवेश करावा. प्रवेशाच्या वेळी शंख वाजवणंही शुभ समजलं जातं, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते.

उजव्या पायाने घरात पहिलं पाऊल ठेवावं

गृहप्रवेशाच्या वेळी पती-पत्नीने उजव्या पायाने घरात पहिले पाऊल ठेवावं. घरात गेल्यानंतर सर्वप्रथम स्वयंपाकघरात चूल पेटवून दूध उकळणं किंवा खीर-हलवा यांसारखे गोड पदार्थ बनवणं परंपरेचा भाग आहे. यामुळे घरात सुख-समृद्धी वाढते.

दक्षिणा देणं

या दिवशी ब्राह्मणांना भोजन देणं आणि श्रद्धेनुसार दक्षिणा देणं पुण्यकारक मानलं जातं. त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला सोनं किंवा इतर मौल्यवान वस्तू अर्पण केल्यास आर्थिक प्रगती होते, अशीही मान्यता आहे.

मुख्य दरवाजावर दिवा लावा

गृहप्रवेशाच्या दिवशी रात्री मुख्य दरवाजावर दिवा लावणं आणि शक्यतो पहिल्या रात्री घर रिकामं न ठेवणंही महत्त्वाचं आहे. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

Maharashtra Politics: मोठी बातमी! रायगडमध्ये भाजपच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Elephanta Caves : 'घारापुरी' लेणीला 'एलिफंटा' हे नाव कसं पडलं? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

उंची कमी असल्यास कपड्यांची निवड कशी करावी? जाणून घ्या 5 स्मार्ट स्टायलिंग टिप्स

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मूळ वेतनात होणार ५१००० रुपयांची वाढ? कसं असेल कॅलक्युलेशन?

SCROLL FOR NEXT