airtel saam tv
लाईफस्टाईल

Airtel Down: नेटीझन्सच्या टिवटिवनं Airtel ला आली जाग; पहा भन्नाट मीम्स

यावर नेटीझन्स थांबतील असं कंपनीला वाटलं पण तसं झाले नाही.

साम न्यूज नेटवर्क

दिल्ली : एअरटेलची मोबाईल आणि ब्रॉडबँड इंटरनेट सेवा (Airtel broadband and mobile service) आज (शुक्रवार) ठप्प झाल्याने ग्राहक कमालीचे वैतागले आहेत. नेटीझन्सनी तर एअरटेलचा सकाळपासून ट्विटरवर चांगलाच समाचार घेतला. त्यामुळेच बहुदा #Airtel Down हा हॅशटॅग ट्रेंड झाला असावा. बहुदा नव्हं तर नेटीझन्सच्या रागाची (टिवटिवची) दखल घेत एअरटेलने ट्विट करुन दिलगिरी व्यक्त केली आहे. (airtel latest news in marathi)

आज सकाळपासून एअरटेलची सेवा विस्कळीत झाल्याने अनेकांना त्याचा त्रास झाला. त्यातून नेटीझन्सनी मिम्सच्या (memes) माध्यमातून एअरटेलची ब्रॉडबँड (broadband) सेवा आणि मोबाईल (mobile) सेवा याबद्दल भावना व्यक्त केल्या. काहींनी मजेदार व्हिडिआे तर काहींनी छायाचित्र पाेस्ट करुन कंपनीला जागं करण्याचा प्रयत्न केला. (airtel latest marathi news)

अवघ्या काही क्षणात ट्विटरवर एअरटेल ट्रेंड झाले. नव्हे ट्राेल हाेऊ लागलं. मग काय कंपनीचे प्रतिनिधी एकेका तक्रारीची दखल घेत उत्तर देऊ लागले. तुमची समस्या निराकरणासाठी टीमला हायलाइट केलं आहे असं उत्तर देऊ लागली. यावर नेटीझन्स थांबतील असं कंपनीला वाटलं पण तसं झाले नाही.

अखेरीस एअरटेलने मागितली क्षमा.

एअरटेलने ट्विट करीत इंटरनेट सेवा तात्पुरत्या स्वरुपात खंडीत झाल्याने ग्राहकांची झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत असं नमूद करुन. सेवा सुरु असल्याचं म्हटलं.

एअरटेलनं दिलगिरी व्यक्त केल्यानंतर देखील अनेक ग्राहकांना नेटवर्कच्या अडचणींना सामाेरे जावं लागले. त्यामुळे आज दुपार पर्यंत नेटीझन्सची एअरटेल विराेधातील टिवटिव काही केल्या बंद झाली नव्हती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Doctor Attack: डॉक्टर रुग्णाला समजावत होते, मुलगा संतापला; केबिनमध्ये घुसून डॉक्टरला मारहाण

Famous Actress Death: प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्रीची प्राणज्योत मालवली; फुफ्फुसांच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी

Alibaug Fort : समुद्राच्या लाटांमध्ये उभा असलेला ३०० वर्षांचा भव्य किल्ला! अलिबागला गेल्यावर 'हे' सिक्रेट ठिकाण नक्की पाहा

Easy Banana Cake Recipe : पिकलेल्या केळीपासून बनवा झटपट टेस्टी चॉकलेटी केक

2029 ला प्रयत्न करा, भाजपच्या दिग्गज नेत्याची विजय वडेट्टीवार यांना पक्षात येण्याची ऑफर; भर सभेत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT