Airtel Data Pack Recharge Saam Tv
लाईफस्टाईल

Airtel चा धमाका! 100 रुपयात मिळणार अनलिमिटेड ऑफर, पॉकेट फ्रेंडली प्लान पाहा

Airtel Data Pack Recharge : जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने नवीन रिचार्ज प्लान आणला आहे. अशातच कंपनीने दोन नवीन रिचार्ज योजना लॉन्च केल्या आहेत. ज्यामध्ये युजर्सना अनलिमिटेड डेटा प्लान मिळतो आहे.

कोमल दामुद्रे

Airtel Recharge Plan :

जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने नवीन रिचार्ज प्लान आणला आहे. अशातच कंपनीने दोन नवीन रिचार्ज योजना लॉन्च केल्या आहेत. ज्यामध्ये युजर्सना अनलिमिटेड डेटा प्लान मिळतो आहे.

एअरटेलचा (Airtel) हा रिचार्ज प्लान १०० रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळत आहे. कंपनी आपल्या सर्व युजर्सना अनलिमिटेड 5G डेटा ऑफर (Offer) करते, परंतु यासाठी वापरकर्त्याचा मोबाइल 5G नेटवर्कशी कनेक्ट असणे आवश्यक आहे.

एअरटेलचा हा रिचार्ज प्लान ४९ रुपये (Price) आणि ९९ रुपयांच्या किमतीत मिळत आहे. एअरटेलचे हे दोन्ही रिचार्ज प्लान डेटा पॅक म्हणून लॉन्च करण्यात आले आहे. या प्रीपेड प्लानमध्ये युजर्सना व्हॉईस कॉलिंगची ऑफर मिळत नाही.

1. ४९ रुपयांचा प्लान

या प्रीपेड रिचार्ज प्लानची ऑफर युजर्सला १ दिवसांसाठी मिळते. युजर्स हा प्लान डेटा अॅड-ऑन म्हणून वापरु शकतात. जर तुमचा डेटा पॅक संपला असेल तर तुम्ही एका दिवसासाठी याचा लाभ घेऊ शकता. कंपनीने प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड डेटा वापरण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत. हा प्रीपेड रिचार्ज प्लान जर आधीपासून सुरु असेल तर या प्लानवर काम करेल. अनलिमिटेड डेटामध्ये तुम्हाला दररोज २० जीबी डेटाचा लाभ मिळेल. डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64kbps पर्यंत कमी होईल.

2. ९९ रुपयांचा प्लान

हा रिचार्ज प्लान दोन दिवसांच्या वैधतेसह मिळत आहे. या प्लानमध्ये यूजर्सना दोन दिवस अमर्यादित डेटाचा लाभ मिळणार आहे. या प्लॅनमध्ये दररोज 20GB डेटा मिळेल. यानंतर इंटरनेटचा स्पीड 64kbps इतका कमी होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घराबाहेर पडताना खिशात ठेवा 'हा' १ पदार्थ, पाकीट कायम पैशांनी भरलेले राहील

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

SCROLL FOR NEXT