Air Cooler Precautions  Saam TV
लाईफस्टाईल

Air Cooler Precautions : कुलर वापरताना 'ही' काळजी घ्या; अन्यथा तुमच्यावरही ओढावू शकतं संकट

Air Cooler Safety Tips in Marathi : कुलरची थंड हाव सर्वांनाच हवीहवीशी वाटते. मात्र कुलर वापरताना विशेष काळजी घेणे देखील गरजेचे आहे. अन्यथा एखाद्या व्यक्तचा जीव देखील जाऊ शकतो.

साम टिव्ही ब्युरो

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे घरोघरी एसी आणि कुलरची संख्या वाढली आहे. एसीपेक्षा सर्वसामान्य कुटुंबीय कुलर खरेदी करणे पसंत करतात. कुलरची थंड हाव सर्वांनाच हवीहवीशी वाटते. मात्र कुलर वापरताना विशेष काळजी घेणे देखील गरजेचे आहे. अन्यथा एखाद्या व्यक्तचा जीव देखील जाऊ शकतो.

थ्री पिन प्लग

कुलरसाठी थ्री पिन प्लगचा वापर करा. कुलरमध्ये जास्त वीज वापरली जाते. तुम्ही टू पिन प्लगवर कुलर चालवत असाल तर विजेचा लोड येतो. त्याने शॉर्टसर्कीट होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा घटना घडण्याआधीच सावध व्हा आणि कुलरसाठी थ्री पिन प्लग तयार करून घ्या.

पाणी भरताना वीज पुरवठा बंद

पाणी विद्युत वाहक आहे. अशात कुलर वीजेवर चालते मात्र थंड हवेसाठी त्यात पाणीच टाकावे लागते. त्यामुळे तुम्ही जेव्हा कुलरमध्ये पाणी टाकत असाल तेव्हा वीज पुरवठा बंद करा. लाईट ऑन असताना तुम्ही पाणी टाकत असाल तर या पाण्यातही करंट उतरतो. असे केल्याने तुम्हाला देखील शॉक लागू शकतो.

टाकीखाली पाणी सांडवू नका

कुलरमध्ये पाणी भरताना ते काळजीपूर्वक भरावे. पाणी खाली सांडणार नाही याची काळजी घ्यावी. पाणी शक्यतो टाकीच्या खाली असलेल्या ट्रेमध्ये सांडवूनका. तसेच पाणी भरताना कुलरच्या बाजूला पाणी सांडणार नाही याचीही काळजी घ्या.

इलेक्ट्रिशियनकडून तपासून घ्या

कुलरचं कनेक्शन आणि वायरिंग इलेक्ट्रिशियनकडून तपासून घेणे गरजेचे आहे. आपण हिवाळ्यात आणि पावसाळ्यात कुलरचा वापर करत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात जेव्हा आपण कुलर वापरण्यासाठी बाहेर घेतो तेव्हा तो इलेक्ट्रिशियनकडून तपासून घ्यावा. कारण काही कारणास्तव वायर तुटण्याची किंवा काही बिघाड होण्याची शक्यता असते. त्यातूनही आपल्याला शॉक लागू शकतो.

कुलरचा वापर करताना अनेक व्यक्ती ही साधी पण महत्वाची काळजी घेत नाहीत. याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी अनेकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता असते. अकोल्यात काल अशीच एक काळीज हेलावणारी घटना घडली होती. शॉक लागून एका ७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. ही चिमुकली कुलरमध्ये पाणी भरत होती. त्यावेळी तिला शॉक लागला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबई गोवा महामार्गावर ८ सिलेंडरने भरलेल्या टेम्पोने घेतला पेट

ICC vs BCB: वर्ल्डकपआधी बांगलादेशच्या अडचणी वाढल्या, ICC नं फटकारलं, सरकार आता काय निर्णय घेणार?

Sheet Mask : तुम्ही चेहऱ्यावर शीट मास्क लावता? मग 'हे' ५ टॉप फायदे जाणून घ्या

Crime News : २ मुलांच्या आईचं दुसऱ्यासोबत सूत जुळलं, वैतागलेल्या नवऱ्यानं आयुष्य संपवलं, बीडमधील धक्कादायक प्रकरण

Homemade Skin care Tips: केमिकलयुक्त महागड्या क्रिमला करा बाय बाय, आता घरातील 'या' 5 गोष्टींनी मिळवा चेहऱ्यावर काचेसारखी चमक

SCROLL FOR NEXT