भारतात 14 वर्षांत HIV नवीन प्रकरणांमध्ये 49% आणि एड्स मृत्यूंमध्ये 80% पेक्षा जास्त घट.
ART उपचार, वाढलेली तपासणी आणि NACP हस्तक्षेप मोठ्या सुधारणांचे कारण.
गर्भवती महिलांमध्ये तपासणी वाढल्यामुळे आईकडून बाळाकडे HIV संक्रमण 75% घटले.
बदलत्या वातावरणामुळे अनेकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. फक्त वातावरण किंवा खाण्यामुळेच नाही तर इतर वाईट सवयींमुळेही अनेक गंभीर आजार होतात. त्यातच जागतिक एड्स दिवसानिमित्त केलेल्या संशोधनात एक महत्वाची बाब समोर आली आहे. यामध्ये HIV च्या रुग्णांची संख्या सांगण्यात आली आहे. पुढे आपण याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.
संशोधनात 2010 ते 2024 दरम्यान देशात नवीन HIV संसर्गांमध्ये तब्बल 49 टक्के घट, तर एड्स-संबंधित मृत्यूंमध्ये 81 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. याच दिवसांमध्ये आईकडून बाळाला होणाऱ्या संसर्गात 75 टक्क्यांची घट झाली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हे बदल राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत (NACP) करण्यात आलेल्या कामगिरीमुळे शक्य झाले आहेत. गेल्या चौदा वर्षांत भारतातील HIV ट्रेंड सातत्याने सकारात्मक दिशेने गेला आहे. नवीन संसर्गांची वार्षिक संख्या अर्ध्याने कमी झाली असून मृत्यूदरात मोठ्या प्रमाणात घसरण दिसत आहे. गर्भवती महिलांमध्ये लवकर तपासणी आणि उपचारांची उपलब्धता वाढल्याने आईकडून बाळाकडे संक्रमण होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात खाली कमी झाले आहे.
देशात HIV चाचण्यांमध्ये मोठी वाढ नोंदली गेली असून 2020–21 मधील 4.13 कोटी चाचण्या 2024–25मध्ये वाढून 6.62 कोटींवर पोहोचल्या. उपचार म्हणजेच एंटी-रेट्रोव्हायरल थेरपी (ART) मिळणाऱ्या लोकांची संख्या देखील 1.49 कोटींवरून 1.86 कोटींवर पोहोचली. उपचार यशस्वी होत आहेत का यासाठी आवश्यक असलेल्या व्हायरल लोड टेस्टिंगमध्येही मोठी वाढ झाली असून त्या 8.9 लाखांवरून 15.9 लाखांपर्यंत वाढल्या आहेत.
WHO च्या अनुसार, HIV लवकर शोधला गेल्यास त्याचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येते. व्यापक तपासणीमुळे संक्रमण लवकर ओळखले जातात आणि लोकांना लगेच ART सुरू करता येते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीचे नुकसान टळते.