Sakshi Sunil Jadhav
आपल्या राशीला आज, आत्ता, ताबडतोब अशी मानसिकता आहे. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा न करता आज तुम्ही कामे कराल. काही जणांचा अध्यात्माकडे कल राहील. मोक्षदा एकादशीचे उत्तम फल मिळेल.
मित्र-मैत्रिणींच्या सहवासाने मन प्रसन्न, प्रफुल्लित राहील. काहींचे वैचारिक परिवर्तनही होईल. अडकलेल्या, दिरंगाई मध्ये, रेंगाळलेल्या गोष्टी आज सुकर होतील.
तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये आज सुसंधी लाभणार आहे. जे ठरवाल ते होईल. हाती घेतलेल्या कामात सुयश मिळेल.कर्म प्रधानता राहील.
भावनिकतेने ओथंबलेली आपली रास आहे. मात्र आज आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही. भाग्याची दालने आपोआप उघडतील. काहींना तीर्थयात्रेचे योग दिसत आहेत.
दैनंदिन कामे रखडतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मान, अपमान, खरेखोटेपणा, चांगले, वाईट या सर्व गोष्टींमध्ये व्यापलेला आजचा दिवस असेल.
तडजोड करतच आयुष्य जगावे लागते अशी काहीशी आपली रास आहे. आज वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद साधाल .आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. स्वतःचे मनस्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी दुसऱ्याला समजून घेणे आज गरजेचे ठरेल.
कर्मचारी वर्गाच्या सहकाऱ्याने पुढे जाणार आहात. आपले कोण परके कोण हे ओळखून वागावे लागेल. दिवस अडचणीचा असला तरी सुद्धा दिवसाच्या शेवटी मार्ग निघालेला असेल.
मुला मुलींचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. एकूणच आपले मनोबल आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या गोष्टी घडणार आहेत. उपासनेमध्ये कुलदेवतेची उपासना आज विशेष फलदायी ठरेल.
प्रॉपर्टी सौख्य आपल्या राशीला चांगले आहे. काहींना कामानिमित्त प्रवासही घडतील. कौटुंबिक सौख्य चांगले राहून घरातील एकमेका व्यक्तींच्या सहकार्याने पुढे जाण्याचे योग आहेत.
न ठरवता अचानक काही गोष्टी घडतील. एखादी महत्त्वाची जबाबदारी अंगावर येऊन पडेल. पण ती तुम्ही निभावूनही न्याल. नातेवाईकांचे चांगले सहकार्य मिळेल.
दैनंदिन कामे मार्गी लागणार आहेत. मन आशावादी आणि आनंदी राहील. गुंतवणूक करायला दिवस चांगला आहे. वारसा हक्काची संपत्ती मिळेल.
स्वतःसाठी जगण्याचा आज अट्टाहास असेल. इतरांवर तुमचा प्रभावही राहील. मनोबल उत्तम राहिल्यामुळे दिवस आनंदी असेल.