AI saree trend goes viral, but fact-check reveals the truth behind photo theft claims. saam tv
लाईफस्टाईल

Fact Check: AI साडी ट्रेंड शरीराचे फोटो चोरतोय? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

AI Saree Trend Privacy Risk : तुम्ही AI वर साडी ट्रेंडमधून फोटो बनवताय का? साडीचा फोटो बनवत असाल तर सावध व्हा. कारण, तुम्ही बनवत असलेला AI साडीचा ट्रेंड चक्क शरीराचे फोटो चोरतोय? असा दावा करण्यात आलाय. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

Sandeep Chavan

  • एआय साडी ट्रेंड सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

  • काही युजर्सनी दावा केला की या ट्रेंडमध्ये शरीराचे फोटो चोरी होतात.

  • फॅक्ट-चेकनुसार बहुतेक दावे अतिरंजित किंवा खोटे आहेत.

हा व्हिडिओ पाहिलात. या व्हिडिओतील तरुणी म्हणतेय मी जो फोटो अपलोड केला होता तो आलाच नाही. फोटो काढताना हातावरील तिळ लपवला. तरीदेखील दुसऱ्या हातावर तीळ असल्याचा फोटो एआयने जनरेट केला. त्यामुळे खरंच तुम्ही बनवत असलेल्या फोटोचा एआयच्या माध्यमातून गैरवापर होतोय का? तुमच्या बॉडीचेही फोटो एआय चोरू शकते का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत. कारण, हा प्रत्येकाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली.

जेमिनी नॅनो बनाना फोटो एडिटिंग टूलने या ट्रेंडमध्ये कोट्यवधी फोटो एडिट केलेयत. या ट्रेंडचा फोटो प्रत्येकाच्या फेसबुक, व्हॉट्सअप स्टेटसवर दिसेल. एवढ्या वेगाने हा ट्रेंड सुरू आहे. काही सेकंदात तुमचा फोटो बदलून मिळतो. त्यामुळे अनेकजण या ट्रेंडच्या प्रेमात पडलेयत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बदललेल्या फोटोमध्येही तुमचा चेहरा सारखाच राहतो.

त्यामुळे अनेकांना आपल्या फोटोचा गैरवापर होऊ शकतो अशी शंका आहे. खरंच या दाव्यात तथ्य आहे का? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने तज्ज्ञांची मदत घेतली.

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

व्हायरल सत्य/साम इन्व्हिस्टिगेशन

जेमिनीमध्ये AI चा साडी ट्रेंड धोकादायक नाही

AI कपड्यांच्या आत बघतं हे खरं नाही

AI तुमच्या जुन्या फोटोचा आधार घेऊन फोटो बनवतं

तुमच्या उपलब्ध फोटोवरूनच फोटो बनवला जातोय

AI तुमची परवानगी घेऊनच फोटोंचा बदल करतंय

सायबर तज्ज्ञांच्या माहितीनुसार, हा फक्त ट्रेंड आहे. नॅनो बनानावर अपलोड केलेले फोटो सुरक्षित सर्व्हरवर प्रक्रिया केले जातात. त्यामुळे तुमची प्रायवसी भंग होणार नाही आणि या ट्रेंडमुळे घाबरण्याचं कारण नसल्याचं सांगितलं. तरीदेखील तुम्ही फोटो अपलोड करताना काळजी घ्या.आमच्या पडताळणीत साडी ट्रेंडमधील AI फोटोचा गैरवापर होऊ शकतो हा दावा असत्य ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माणिकराव कोकाटेंना जेल की बेल, फैसला कधी? न्यायमूर्तींनी एका वाक्यात सांगितलं | VIDEO

कळमनुरीत भाजपचा आमदार वाढेल; प्रज्ञा सातव यांच्या पक्ष प्रवेशानंतर मुटकुळेंचा दावा, शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: कोकाटेंच्या शिक्षेला हायकोर्टाची स्थगिती नाही

शिंदेंच्या भावाचं नाव ड्रग्ज प्रकरणात? बड्या नेत्याचा गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT