Sunday remedies for success saam tv
लाईफस्टाईल

Ravivar Upay: रविवारच्या दिवशी सूर्यदेवाची पुजा केल्यानंतर करा 'हे' उपाय; अडकलेली सर्व कामं होणार पूर्ण

Sunday remedies for success: ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology), रविवारचा दिवस ग्रहांचा राजा मानल्या गेलेल्या सूर्यदेवांना (Surya Dev) समर्पित आहे. सूर्य हा ऊर्जा, आत्मविश्वास, यश आणि सन्मानाचा कारक मानला जातो.

Surabhi Jayashree Jagdish

  • रविवार हा सूर्यदेवाला अर्पित दिवस मानला जातो.

  • सूर्यदेवाची पूजा करणे जीवनात शुभ फल देते.

  • अर्घ्य देताना ‘ॐ सूर्याय नमः’ मंत्र जपावा.

हिंदू धर्मात रविवार हा दिवस ग्रहांच्या अधिपती सूर्यदेवाला अर्पण केलेला मानला जातो. या दिवशी व्रत पाळून, सूर्यदेवाची पूजा करून आणि दान केल्यास अत्यंत शुभ फल प्राप्त होतं असं मानण्यात येतं.

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यदेवाची कृपा मिळाल्यास जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि मान-सन्मान वाढतो. रविवारी पूजा करण्याबरोबरच काही खास उपाय केल्यास जीवनातील अडचणी दूर होतात आणि भाग्य उजळते. चला तर मग जाणून घेऊया हे सोपे उपाय

सूर्यदेवाला अर्घ्य द्या

रविवारी सकाळी स्नान केल्यानंतर तांब्याच्या लोट्यात पाणी, लाल फुलं आणि तांदूळ टाकून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावं. अर्घ्य देताना ‘ॐ सूर्याय नमः’ हा मंत्र जपल्यास सूर्यदेव प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा लाभते.

लाल चंदनाचा तिलक लावा

रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी कपाळावर लाल चंदनाचा तिलक लावावा. यामुळे तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कार्यात यश मिळतं आणि आत्मविश्वास वाढतो. या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान करणे देखील शुभ मानले गेले आहे.

मुख्य दरवाजाजवळ दिवा लावा

रविवारी घराच्या मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूंना देशी तुपाचा दिवा लावल्यास सूर्यदेव आणि लक्ष्मीमातेची कृपा प्राप्त होण्यास मदत होते. यामुळे घरात धन-धान्याची वाढ होते आणि वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

दान करा

सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी रविवारी गूळ, दूध, तांदूळ किंवा लाल रंगाचे कपडे दान करावेत. असं केल्याने अडलेली कामं पूर्ण होतात आणि तुमच्यासाठी सगळे नशीबाचे दरवाजा उघडतात.

पिंपळाखाली दिवा लावा

रविवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा चौमुखी दिवा लावा. या उपायामुळे घरात सुख-समृद्धी नांदते, तणाव दूर होतो आणि मान-सन्मान वाढतो.

रविवारी कोणाची पूजा करावी मानली जाते?

रविवारी सूर्यदेवाची पूजा करावी मानली जाते.

सूर्यदेवाला अर्घ्य देण्यासाठी कोणता वापर करावा?

तांब्याच्या लोट्यात पाणी, लाल फुले आणि तांदूळ टाकावेत.

रविवारी कपाळावर कोणता तिलक लावणे शुभ मानले जाते?

लाल चंदनाचा तिलक लावणे शुभ मानले जाते.

घराच्या मुख्य दरवाजाजवळ काय लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते?

देशी तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President: चर्चा ६ नावांची; वर्णी मात्र महाराष्ट्राच्या राज्यपालांची, राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यामागे काय आहे भाजपचा राजकीय डाव?

Hair Care Tips: केसांना दही लावल्याने होतात 'हे' भन्नाट फायदे

Video : तेरे जैसा यार कहाँ... गाणं म्हणणारे तहसीलदार निलंबित, निरोप समारंभाची पोस्ट पडली महागात

Maharashtra Politics : शिंदेसेनेला हादरा, नाराज नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत

Horoscope Monday : सोमवार ठरणार भाग्याचा, रखडलेली कामे होणार पूर्ण; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT