After Breakup Move On Tips Saam TV
लाईफस्टाईल

After Breakup Move On Tips : ब्रेकअपनंतर तिला किंवा त्याला विसरणं कठीण झालंय? मग 'या' टिप्ससह नव्याने जगायला सुरूवात करा

साम टिव्ही ब्युरो

कांचन सोनावणे

हल्लीच्या काळात तरुणांमध्ये ब्रेकअप होण्याचे प्रमाण वाढले आहे. ब्रेकअप झाल्यानंतर तरुणांचं मानसिक स्वास्थ बिघडतं. ब्रेकअप का झालं? कोणामुळे झालं? त्यात नेमकी आपली चूक होती का? असे अनेक प्रश्न तरुणांना भेडसावत असतात. ब्रेकअपनंतर फक्त नाते तुटत नाही तर भावना सुद्धा दुखावल्या जातात. अशा प्रंसगी काय कराव, कसं वागाव, कोणाशी बोलावं हे समजत नाही आणि या सगळ्या होणाऱ्या त्रासातून एकच पर्याय उरतो तो म्हणजे मूव्ह ऑन होणे.

म्हणजेच झालेल्या गोष्टीतून बाहेर पडणे आणि स्वताला वेळ देणे हे अनेकांना कळत नसतं. एका बाजूने करिअर आणि इतर जबाबदाऱ्या असताना दुसऱ्या बाजूने ब्रेकअप सारख्या वेदना देणाऱ्या घटनांना ते सामोरे जात असतात. अशावेळी ब्रेकअपमुळे झालेल्या मानसिक तणावातून बाहेर पडून आनंदी आयुष्य जगण्यासाठी काय करावं? त्या व्यक्तीसोबत बराच काळ घालवला असेल आणि अचानक नात्यात दुरावा येऊ लागला तर सहन करणे शक्य होत नाही. त्यामुळे या गोष्टींतून बाहेर पडण्यासाठी नेमकं काय करावं याच्या काही टिप्स जाणून घेऊ.

स्वत:ची काळजी घेणे -

ब्रेकअपनंतर आपण आपल्या जोडीदाराशिवाय जगू शकत नाही, असं आपल्याला वाटत असतं. ब्रेकअपनंतर आपलं दुख्ख इतकं वाढतं की दिवस रात्र आपण उपाशी राहतो. रडून रडून खुप त्रास करून घेतो, आपल्या मनात एकाच वेळी दुख्ख, राग,अपराधीपणाच्या भावना येतात. या सगळ्या समस्यांकडे दुर्लक्ष करून आपण मानसिक आणि शारिरिक कळजी घेण जास्त गरजेच आहे. अशावेळी आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी करण्यासाठी वेळ द्यावा आणि नविन गोष्टी करण्याचा प्रयत्न करावा.

मित्र -मैत्रिणीसोबोत वेळ घालवा - अशा वेळी एकट न राहता मित्र मैत्रिणी सोबत वेळ घालवावा आपल्याला सतत येणाऱ्या भावनांबद्दल त्याच्याशी मनमोकळ्यापणाने बोलावं, ब्रेक अपनंतर बऱ्याचदा सर्वकाही निरर्थक वाटू लागत अशा वेळी आपल्या जवळच्या व्यक्तीशी बोलावं.

योगा

Meditation ,व्यायाम करा ज्यातून मनाची एकाग्रता वाढेल ,शरीर तंदुरस्त आणि मन ही फ्रेश राहील उत्साह वाढेल सकारात्मक रहा. त्यातून बाहेर कसं पडायचं हे देखील तितकेच महत्त्वाचे असते ब्रेक अप नंतर त्यागोष्टीतून बाहेर पडण्याचा शोध अनेकजण घेत असतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fruits: फ्रिजमध्ये फळं ठेवण्याआधी 'हे' वाचाच

Pakistan Firing : पाकिस्तान संसद परिसर गोळीबाराने दणाणला, इमरान खान समर्थक झाले आक्रमक; नेमकं काय घडलं?

Haryana Election : हरियाणात भाजप सत्ता राखणार की काँग्रेस झेंडा फडकवणार? किती टक्के झालं मतदान? वाचा

Video : 'ते महाविकास विरोधी लोकं'; मोदींचा घणाघात !

Hingoli Crime : हिंगोलीत फिल्मी स्टाईल थरार; कोट्यवधींच्या खंडणीसाठी वृद्धाचं अपहरण करणाऱ्या 6 जणांच्या आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT