Shukra Gochar In Tula saam tv
लाईफस्टाईल

Shukra Gochar: ९ दिवसांनंतर शुक्रामुळे 'या' राशींवर बरसणार पैसा; धनलाभासोबत मानसिक स्थितीही सुधारणार

Shukra Gochar In Tula: ज्योतिष्य शास्त्रानुसार, एका विशिष्ट काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये परिवर्तन करतात. येत्या काळात अजून एक ग्रहाचं गोचर होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक जोतिष्य शास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी सप्टेंबर महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांनी गोचर केलंय. या ग्रहांच्या गोचरमुळे काही खास राजयोग देखील तयार झाले आहेत. येत्या काळात अजून एक ग्रहाचं गोचर होणार आहे. या ग्रहाच्या गोचरमुळे सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे.

सुख, समृद्धी कारक असलेला शुक्र ग्रह येत्या काळात गोचर करणार आहे. सध्या शुक्र कन्या राशीत आहे आणि 18 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता तूळ राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान शुक्र ग्रहाच्या गोचरमुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना खास लाभ होणार आहे ते पाहूयात.

तूळ रास

ज्योतिष शास्त्रानुसार तूळ राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकणार आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळणार आहे. वैवाहिक जीवन चांगलं राहणार आहे. चांगल्या व्यक्तींचे वैवाहिक प्रस्ताव येतील. या काळात विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने परिणाम मिळू शकणार आहेत.

मकर रास

यावेळी मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद येणार आहे. तुमच्या वडिलांसोबत तुमचं नातं घट्ट होणार असून ते प्रत्येक कामात तुम्हाला पाठिंबा देणार आहेत. कौटुंबिक वातावरण आनंदी राहणार आहे. तुम्ही काही नवीन काम करण्याचा विचार करत असाल तर यावेळी तुम्हाला यश मिळू शकतं.

कुंभ रास

ज्योतिष शास्त्रानुसार, कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला राहणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत उपलब्ध होणार आहेत. कामाच्या ठिकाणी तुम्ही चांगली कामगिरी करू शकता. जर तुम्ही खूप दिवसांपासून परदेशात जाण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमचं स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकते.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT