tourism  yandex
लाईफस्टाईल

Affordable Foreign Trips : परदेशात फिरायचा प्लान आहे? 25000 ते 30000 रुपयांच्या बजेटमध्ये ५ देशात फिरू शकता, वाचा

Vishal Gangurde

मुंबई : लोक त्यांच्या जीवनात फार व्यग्र झाले आहेत. लोक दिवसभर त्यांच्या कामात गुंतून असतात. यामुळे अनेकांना कुटुंबासोबत वेळ घालवायला मिळत नाही. अनेकांना बाहेर फिरण्याची खूप इच्छा असते. त्यामुळे या व्यग्र वेळापत्रकातूनही वेळ काढून कुटुंबासोबत फिरायला जायला हवं. पैशांचा फार विचार करू नका. तुम्ही कमी बजेटमध्येही कुटुंबासोबत परदेशातही जाऊ शकतात.

जगातील ५ देशात तुम्ही अवघ्या २५ ते ३० हजारांच्या बजेटमध्ये फिरू शकतात. या देशांत विमानाने जायचं तिकीट दरही कमी आहे. अनेक ऑनलाइन वेबसाईट्सवर तिकीट बुकिंगसाठी चांगल्या ऑफर दिल्या जातात. मात्र, आम्ही या लेखात विमानाच्या तिकीटाचे पैसे मोजले नाहीत.

नेपाळ

नेपाळ हा देश भारताच्या खूप जवळचा देश आहे. या देशात ३०००० रुपयांमध्येही फिरू शकता. नेपाळला जाण्यासाठी हवाई मार्ग, रेल्वे आणि रस्त्याच्या मार्गानेही जाऊ शकता. तुम्ही काठमांडूमध्ये जाऊ शकता. या शहरात सुंदर मंदिर आणि बाजारपेठ आहे. काठमांडूमध्ये पशुपतिनाथ मंदिर हे प्रसिद्ध मंदिर आहे.

श्रीलंका

श्रीलंका हा निसर्गरम्य देश आहे. या देशात पुरातन काळातील मंदिर, ऐतिहासिक स्थळासहित अनेक पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता. रावण धबधब्याच्या ठिकाणीही भेट देऊ शकता. श्रीलंकेत फिरण्यासाठी सार्वजनिक वाहनांचा वापर केल्यास फायदेशीर ठरेल. दिल्लीहून श्रीलंकेला जाण्यासाठी विमानाचं तिकीट अवघ्या ८ ते १३ हजारापर्यंत मिळतं. तुम्ही श्रीलंकेत २५ ते ३० हजारांच्या बजेटमध्ये फिरू शकता.

बँकॉक

भारतीयांना बँकॉकमध्ये फिरायला खूप आवडतं. येथील रस्त्यावरील बाजारपेठ जगात प्रसिद्ध आहे. रस्त्यावर मिळणारे स्थानिक खाद्यपदार्थ पर्यटकांना खूप आवडतात. बँकॉकमध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत. यामध्ये लुम्बिनी पार्क, एमराल्ड मंदिराचा समावेश आहे. येथील अनेक प्रसिद्ध लग्झरी हॉटेल देखील आहेत. दिल्लीहून बँकॉकला जाण्यासाठी विमानाचं तिकीट १० ते १२ हजार रुपयांमध्ये येतं.

दुबई

दुबईमधील बुर्ज खलीफा कोणाला आवडत नाही. या जगप्रसिद्ध ठिकाणी भेट देण्यासाठी हजारो लोक दररोज हजेरी लावत असतात. दुबईमध्ये प्रसिद्ध मॉल, थारचे वाळवंट पर्यटकांना मोहात पाडतात. दुबईला फिरण्यासाठी विमानाच्या तिकीटाव्यतिरिक्त खाण्यापिण्यासहित फिरायला २८००० ते ३०००० रुपये खर्च येऊ शकतात. दोन लोक दुबईला विमान प्रवासासहित ८०००० रुपयांमध्ये फिरू शकतात.

मलेशिया

परदेशवारीसाठी मलेशिया हा चांगला देश आहे. मलेशियात धार्मिक पर्यटन स्थळे देखील आहेत. मलेशियात बटू लेणी सर्वात प्रसिद्ध ठिकाणापैकी एक आहे. या देशात राहायचा खर्च १५०० ते १०००० पर्यंत येऊ शकतो. फिरणे आणि खाण्याचा खर्च दिवसाला ५००० रुपये येऊ शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi In Thane: मराठी, मेट्रो अन् मविआ; ठाण्यात PM मोदींची विरोधकांवर चौफेर टीका

Pune Devi Temple : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे जम्मूच्या वैष्णो देवी मंदिराची प्रतिकृती

VIDEO : उद्धव ठाकरेंचा मोदी-शिंदेंवर 'ठाकरी बाण'

Marathi News Live Updates : काँग्रेसची ज्या राज्यात सत्ता येते ती राज्य उध्वस्त होतात, नरेंद्र मोदी

Fashion Tips : बॅगी जीन्ससोबत ट्राय करा 'हे' टॉप्स, फॅशन ट्रेंडमध्ये दिसाल स्टायलिश!

SCROLL FOR NEXT