Adhik Maas Third Shravani Somvar 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Adhik Maas Third Shravani Somvar 2023: अधिक मासातील तिसऱ्या श्रावणी सोमवारी शुभ संयोग! या राशींचे उजळेल भाग्य, होईल धनलाभ

Shravani Somvar 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार अधिक श्रावण महिन्यांचा योगायोग 19 वर्षांनंतर आला आहे.

कोमल दामुद्रे

Third Shravni Somvar 2023 : श्रावण महिना हा पावित्र्याचा व व्रतवैकल्याचा असतो. या महिन्यात भगवान शंकराची मनोभावे पूजा केल्यास आपल्याला सर्व इच्छा पूर्ण होतात. यंदा श्रावण मास हा ५९ दिवसांचा असून त्यात अधिक श्रावण व निज श्रावण असे दोन वेगवेगळे महिने आले आहेत.

ज्योतिषशास्त्रानुसार अधिक श्रावण महिन्यांचा योगायोग 19 वर्षांनंतर आला आहे. अधिकमासाचा तिसरा सोमवार आहे. आज, 7 ऑगस्ट 2023, सोमवारी शुभ योग तयार झाला आहे. श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सप्तमी तिथी येत आहे. यासोबतच अश्विनी नक्षत्र आणि रवि योगही तयार होत आहे.

रवियोगात शुभ कार्य, पूजा-पाठ इत्यादी केल्याने मान-सन्मान वाढतो आणि धनही वाढते. ज्योतिषशास्त्रानुसार, श्रावणी (Shravan) सोमवारी तयार होणारे हे शुभ योग काही राशींसाठी खूप शुभ आहेत. ज्यांचे भाग्य उजळेल तसेच धनलाभही होईल. जाणून घ्या तुमची रास यात आहे का?

1. वृषभ :

आज वृषभ राशीचे लोक आनंदी राहतील. कोणतेही नवीन काम सुरू करू शकता आणि त्यात यश मिळेल. करिअरमध्ये (Career) प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. आदर वाढेल. धार्मिक प्रवासाला जाण्याची शक्यता आहे.

2. मिथुन:

मिथुन राशीच्या लोकांसाठी आज सोमवारचा दिवस खूप शुभ आहे. जर तुम्हाला नवीन काम सुरू करायचे असेल तर तुम्ही ते करू शकता. मालमत्तेतून (Property) लाभ होईल. गुंतवणुकीसाठी शुभ दिवस. धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल.

3. मकर:

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी आणि व्यवसायासाठी फायदेशीर आहे. तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. नवीन काम सुरू करू शकता. मालमत्ता-वाहन खरेदीची शक्यता निर्माण झाली आहे.

4. कुंभ :

कुंभ राशीच्या लोकांना आज फायदा होईल. तुम्ही करिअरमध्ये नवीन संधी मिळतील त्यातून फायदेही मिळतील. जोडीदाराकडून आवश्यक सहकार्य मिळेल. जीवनात आनंद मिळेल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Shocking News : शिक्षक की राक्षस? खराब अक्षरामुळे ८ वर्षांच्या मुलाला दिले मेणबत्तीचे चटके

Maharashtra Live News Update: अमेरिकेने भारतावर २५ टक्के टॅरिफ लावला

माणिकराव कोकाटे सभागृहात किती वेळ रम्मी खेळत होते? रोहित पवारांनी वेळेचा आकडाच सांगितला|VIDEO

Rajnikanth News : रजनीकांत वर्तमानपत्र उचलायला वाकले अन् तोंडावर आपटले; चाहत्यांची चिंता वाढली

ITR 2025: आयटीआर ३ फॉर्म आता ऑनलाइन पाहता येणार, आयकर रिटर्न भरण्याची सोपी पद्धत काय? वाचा...

SCROLL FOR NEXT