Acidity Problem Saam Tv
लाईफस्टाईल

Acidity Problem : छातीत वारंवार जळजळ होतेय ? 'या' 5 आयुर्वेदिक उपायांनी मिळेल त्वरीत आराम !

अन्न खाल्ल्यानंतर अनेक वेळा अपचन, आंबट ढेकर आणि उलट्या या समस्यांना सामोरे जावे लागते.

कोमल दामुद्रे

Acidity Problem : आजकाल, अस्वास्थ्यकर जीवनशैली आणि अस्वस्थ आहारामुळे अनेक लोक आरोग्याशी संबंधित विविध समस्यांनी त्रस्त आहेत. यामध्ये अॅसिडिटीच्या समस्येचाही समावेश होतो.

अन्न खाल्ल्यानंतर अनेक वेळा अपचन, आंबट ढेकर आणि उलट्या या समस्यांना सामोरे जावे लागते. ही सर्व अॅसिडिटीची लक्षणे आहेत. अॅसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारचे आयुर्वेदिक उपायही करून पाहू शकता.

आपण तात्पुरता अॅसिडिटीवर उपाय मिळवण्यासाठी नेहमी सोडा घेतो, इनो घेतो, ते आपल्या शरीरासाठी योग्य नाही त्यासाठी आता चिंता करायची गरज नाही.आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय काही आयुर्वेदिक घरगुती उपाय

1. तुळशीची पाने

तुळशीची पाने ही आरोग्यासाठी (Health) लाभदायक असतात. तुळस सहज उपलब्ध होते त्यामुळे अॅसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठी आपण तुळशी चा उपयोग करू शकतो. तुम्हाला जर जळजळ होत असेल तर तेव्हा तुळशीची पाने चावून चावून खा किंवा ३-४ पाने कपभर पाण्यात उकळून त्याचा काढा करून प्या.

2. गूळ

हिवाळ्यात गुळ खाणे फायेशीर (Benefits) असते.गुळ खाल्याने अॅसिडिटीचा त्रास कमी होतो.जर तुम्हाला ऍसिडिटीचे लक्षणे दिसत असेल तर गुळ खाल्याने अॅसिडिटी लगेच बरी होते.

3. केळी

अॅसिडिटी टाळण्यासाठी केळी (Banana) खाणे हा सोपा उपाय आहे. केळी थंड असते त्यामुळे छातीत जळजळ होत असेल तर केळी खाल्यावर लगेच आराम मिळते.

Acidity Problem

4.बडीशेप

जेवणानंतर बेडीशेप खाल्यावर पचनास मदत करतात त्यामुळे बऱ्याच हॉटेल्स मध्ये जेवणानंतर बडीशेप खायला देतात.बेडीशेपमुळे पोटाला गारवा मिळतो. अॅसिडिटी झाल्यावर बडीशेप खाऊन त्वरित आराम मिळतो.

5.थंड दूध

दुधामध्ये कॅल्शियम,vitamins,मिनिरलस असतात त्यामुळे डॉक्टर नेहमी दुध पिण्याचा सल्ला देतात दुधाचे अनेक फायदे होतात.आरोग्य निरोगी राह्यासाठी दुध महत्वचे आहे.थंडगार दुध पिल्यावर छाती मध्ये जळजळ होणे थांबते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bajarang Sonawane : बीड जिल्ह्यात लोकसभेची पुनरावृत्ती निश्चित; खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला विश्वास

Bank Job: इंडियन बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी भरती सुरु, पगार किती? जाणून घ्या

VIDEO : खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार कल्याणशेट्टी यांच्यात वाकयुद्ध | Marathi News

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

moravala Recipe: ‪आता घरच्या घरीच बनवा मोरावळा

SCROLL FOR NEXT