Auspicious Moles google
लाईफस्टाईल

Lucky Moles: कुठे तीळ असल्यावर लक्ष्मीची कृपा बरसेल? नाक, ओठ की...

Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार शरीरावरील काही तिळ हे भाग्यवान आणि शुभ मानले जातात. छाती, कपाळ, भुवया किंवा हातावरील तिळ आयुष्यात यश, धनलाभ आणि समृद्धी दर्शवतात.

Saam Tv

प्रत्येकाच्या शरीरावर तीळ असतात. काहींच्या हातावर, बोटावर, पायावर, मानेवर अगदी डोळ्यात सुद्धा तीळ असतो. ज्योतिशास्त्रात तिळाला प्रचंड स्थान आहे. तसेच सामुद्रिक शास्त्रातही शरीरावर तीळ असणे शुभ लक्षण आहे. पण तुम्हाला माहितीये का? शरीराच्या काही भांगावर तीळ असेल तर तुम्ही लकी असता. त्याचा तुमच्याशरीरावर काय परिणाम होतो हे जाणून घ्यायचे असेल तर पुढील माहिती लगेचच वाचा.

सामुद्रिक शास्त्रात तीळाला प्राचीन काळापासून मोठे महत्त्व आहे. या शास्त्रात शरीराची रचना, बनावट तसेच शरीरावर असलेले तीळ व खुणा यांचा अर्थ सांगितला जातो. या तीळांवरून व्यक्तीचा स्वभाव, भाग्य आणि आयुष्याबद्दल बरेच काही कळते, असे मानले जाते. सामुद्रिक शास्त्रानुसार काही तिळ शुभत्वाचे प्रतीक मानले जातात. पुढे आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

१ छातीच्या मध्यभागी तीळ असणे.

छातीच्या मध्यभागी तीळ असल्यास व्यक्ती भाग्यवान असतो. त्याला कधीही धनाची कमतरता भासत नाही व लक्ष्मीची कृपा त्याच्यावर असते.

२ उजव्या हाताच्या तळहातावर तीळ असणे.

ज्या व्यक्तींच्या उजव्या हाताच्या तळहातावर तीळ असतो. त्या व्यक्तींना आयुष्यात सतत धनलाभ होत राहतो, अशी मान्यता आहे. मेहनती लोकांच्या हातावर हा तिळ आढळतो. अशा व्यक्तींची आर्थिक स्थिती नेहमी चांगली राहते.

३ भुवयांच्या मधोमध तीळ असणे.

भुवयांच्या मध्ये तीळ असणे हेही अतिशय शुभ मानले जाते. अशा व्यक्तींना जीवनात मोठे यश मिळतं तसेच समाजात आदर व मानही प्राप्त होतो. या तिळामुळे व्यक्तीला आयुष्यात अपार यश, प्रतिष्ठा व सन्मान मिळतो.

४ नाकावर तीळ असणे.

नाकावर तिळ असल्यास तो सौभाग्य आणि यशाचे चिन्ह मानला जातो. वैवाहिक दृष्टीने हा व्यक्ती सुखी असतो.

५ माथ्याच्या उजव्या बाजूस तीळ असणे.

माथ्याच्या उजव्या बाजूला तिळ असणे हे धन आणि समृद्धीचे लक्षण मानले जाते. हा तिळ आर्थिक स्थैर्य व सतत पैशाची आवक यांचे लक्षण मानला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Disease Symptoms: डोळ्यातून पाणी अन् त्वचेत बदल जाणवतोय? असू शकतात किडनी फेल्युअरची लक्षणे, वाचा संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update : दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

Shocking News : आईच्या मृतदेहासोबत बंद खोलीत कोंडून घेतलं, १३ वर्ष घराबाहेर पडला नाही, नेमकं काय प्रकरण

Amravati : अमरावती जिल्ह्यात ३५ टक्के शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून दूरच; शासनाची हमी हवेतच

Maharashtra Politics : दिवाळीत धमाका! भाजपच्या गळाला मोठा मासा, ६ टर्म आमदार कमळ घेण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT