Aadhar Card Safety Tips Saam tv
लाईफस्टाईल

Aadhar Card Safety Tips : आधार कार्डधारकांनो सावधान! तुमची एक चूक अन् बँक खाते होईल रिकामे...

Aadhar Card Fraud : तुमच्याकडून आधार कार्ड हाताळताना झालेल्या छोट्याशा चुकीमुळे तुम्हाला फसवणुकीला सामोरे जावे लागू शकते.

कोमल दामुद्रे

Aadhar Card link Bank Account : आपण सर्व आधार कार्ड वापरतच असाल. आधार कार्ड प्रत्येक भारतीय नागरिकांच्या ओळखपत्राचे काम करते. हे कार्ड एखाद्या महत्त्वाच्या कागदपत्राप्रमाणे आहे. आपल्याला प्रत्येक कायदेशीर कामात याची आवश्यकता भासतेच.

मोबाइलचे (Mobile) सीम कार्ड घ्यायचे असेल, रेशन कार्ड घ्यायचे असेल, एखादी गाडी घ्यायची असेल, बँकेत खाते उघडायचे असेल, एखादे सरकारी काम करायचे असेल किंवा अगदी आपली स्वतःची ओळख देखील सांगायची असेल तरी आपल्याला आधार कार्डची आवश्यकता असतेच. पण तुमच्याकडून आधार कार्ड (Aadhar card) हाताळताना झालेल्या छोट्याशा चुकीमुळे तुम्हाला फसवणुकीला सामोरे जावे लागू शकते. काय आहेत त्या चुका आणि कशाप्रकारे त्यांना टाळता येऊ शकते जाणून घेऊयात सविस्तर.

1. जर तुम्ही ई-आधार कार्डला डाउनलोड करण्यासाठी कोणत्याही सायबर (Cyber) कॅफे, एखाद्या मित्राचा मोबाईल अथवा कोणत्याही प्रकारच्या सिस्टिमचा वापर करत असाल तर असे करणे धोकादायक ठरू शकते. असे केल्यास तुमच्या आधार कार्डचा वापर अनोळखी लोकं चुकीच्या पद्धतीने करु शकतात, ज्यामुळे तुमची वैयक्तिक माहीती लीक फसवणूक होण्याचा धोका वाढू शकतो.

2. आपण आपले आधार कार्ड इतर व्यक्तिच्या ताब्यात देण्याची चूक कधीही करू नये. जर महत्त्वाचे काम असले तर आधार कार्डची कॉपी द्यावी पण त्याचा उपयोग फक्त चांगल्या कामासाठी केला जातोय की, नाही या गोष्टीची खबरदारी बाळगावी. अन्यथा आताच्या काळात अशा प्रकारच्या फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आपल्या आधार कार्डबाबत या छोट्या-छोट्या चुका करणे टाळावे.

3. जर तुम्हाला काही कारणास्तव आपल्या आधार कार्डची कॉपी द्यावी लागत असेल तर, त्यामुळे तुम्ही त्यावर ते काम लिहू शकता, जेणेकरून तुमच्या आधार कार्डचा चुकीचा वापर केला जाणार नाही.

4. तुम्हाला तुमचे आधार कार्ड चोरट्यांपासून व फसवणूक करणाऱ्यांपासून वाचवण्यासाठी आधार कार्डला 'मास्क्ड' करून घेऊ शकता. असे केल्यास तुमच्या आधार कार्डवरील १२ अंकांपैकी सुरूवातीचे ८ अंक दिसणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT