Aadhar Card Loan  Saam Tv
लाईफस्टाईल

Aadhar Card Loan : आधारकार्डवर मिळतंय 4.78 लाखांचं लोन, तुम्हाला माहित आहे का ?

केंद्र सरकार आधार कार्ड धारकांना 4 लाख 78 हजार रुपयांचे कर्ज देत आहे.

कोमल दामुद्रे

Aadhar Card Loan : सध्या सोशल मीडियावर दररोज काहींना काहीतरी व्हायरल होत असते. असाच एक मेसेज सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे ज्यामध्ये केंद्र सरकारने देशातील सर्व आधार कार्डधारकांना 4 लाख 78 हजार रुपयांचे कर्ज देत असल्याचा दावा केला जात आहे. नेमके काय प्रकरण आहे हे समजून घेऊया

काय आहे व्हायरल मेसेज

आधार कार्डधारकांबाबत सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये केंद्र सरकार (Government) आधार कार्डद्वारे कर्ज देत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मेसेजसोबत एक लिंक दिली जात आहे, ज्यावर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.

हा दावा पूर्णपणे खोटा आहे

केंद्र सरकारकडून आधार कार्ड धारकाला ४ लाख ७८ हजार रुपये मिळाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पीआयबी फॅक्ट चेक टीमने या बातमीची चौकशी केली आणि त्यातील खरे कारण शोधून काढले. तपासात फॅक्ट चेक टीमला आधारवरून कर्ज म्हणून 4 लाख 78 हजार रुपये मिळाल्याची बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे आढळून आले. टीमने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर संदेश शेअर केला आणि लिहिले की, हा दावा पूर्णपणे खोटा आहे.

असे मेसेज फॉरवर्ड करु नका

पीआयबी फॅक्ट चेकच्या टीमने आधार कार्ड धारकाला 4 लाख 78 हजार रुपयांच्या कर्जाचा मेसेज इतरांना शेअर न करण्यास सांगितले आहे आणि ते हटवण्याचा सल्लाही दिला आहे. तुमची वैयक्तिक माहिती आणि बँक तपशील कुणासोबतही शेअर करू नका असे टीमने सुचवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : सोलापुरात शिष्यवृत्ती घोटाळा; ३.६२ कोटींची अफरातफर, तीन अधिकारी निलंबित

Rajyasabha Election: तावडे, आवठवलेंसह भाजपच्या उमेदवारांनी भरला उमेदवारी अर्ज

Maharashtra Live News Update: बदलापूर स्त्री बीज प्रकरणाचं जळगाव कनेक्शन

Arjun Tendulkar Wedding : शुभमंगल सावधान! सचिनच्या लेकाचं झालं लग्न, अर्जुन-सानियानं घेतले सातफेरे, पाहा व्हिडिओ

Sakhee Gokhale: मोकळे केस अन् घायाळ करणारं सौंदर्य

SCROLL FOR NEXT