World Braille Day
World Braille Day  Saam Tv
लाईफस्टाईल

World Braille Day : वांगणीत लुई ब्रेल यांना अनोखं अभिवादन; दृष्टीहीनांसाठी आयोजित केलं आरोग्य शिबिर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई, अजय दुधाणे

Vangani News : आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला थकवा, डोळ्यांना खाज येणे, डोळे कोरडे पडणे, अंधुक दिसणे व सतत डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो, अशा अनेक डोळ्यांचा आजार आपण पाहीले आहेत. परंतू अंध व्यक्तींच्या रोजगारासाठी ब्रेल लिपीचा वापर होतो.

एक काळ असा होता जेव्हा अंध लोक लिहिता-वाचण्याची कल्पनाही करू शकत नाहीत, परंतु लुई ब्रेल यांनी अगदी लहान वयात एक लिपी तयार केली ज्याच्या मदतीने अंध लोक देखील लिहू आणि वाचू शकतात.

ब्रेल लिपी म्हणजे काय?

ब्रेल हा एक प्रकारचा कोड आहे. ती एक भाषा म्हणून पाहिली जाते आणि 6 बिंदूंच्या तीन ओळींमध्ये एक कोड बनविला जातो. त्यामध्ये संपूर्ण सिस्टमचा कोड छापलेला आहे. याच्या मदतीने अंध व्यक्ती लिहिता-वाचू शकतात आणि आता संगणकातही वापरता येणार आहेत. त्यात गोलाकार आणि उंचावलेले बिंदू आहेत.

लुई ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त वांगणीत दृष्टीहीनांसाठी आरोग्य शिबिर आयोजन -

दृष्टीहीनांसाठी ब्रेल लिपीचा शोध लावणारे फ्रेंच शास्त्रज्ञ लुई ब्रेल यांच्या २१३ व्या जयंतीनिमित्त वांगणीत अंध नागरिकांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. वांगणीतील साई सेवा हॉस्पिटलच्या वतीनं या शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं.

वांगणीत मोठ्या संख्येनं अंध नागरिक वास्तव्याला आहेत. या अंध नागरिकांसाठी साई सेवा हॉस्पिटल आणि नॅशनल फेडरेशन ऑफ व्हिज्युअल इम्पेअर्ड पर्सन या संस्थेच्या वतीने या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होते.

या शिबिरात अंध बांधवांची संपूर्ण आरोग्य चाचणी करण्यात आली. तसंच डॉक्टरांनी त्यांना मार्गदर्शन करत औषधं सुद्धा दिली. यावेळी शिबिरात सहभागी झालेल्या तब्बल २०० अंध नागरिकांना साई सेवा हॉस्पिटलच्या वतीने दृष्टी कार्डचं वाटप करण्यात आलं. या कार्डच्या सहाय्याने या अंध नागरिकांवर वर्षभर अल्पदरात उपचार केले जाणार आहेत.

साई सेवा हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर सतीश भोईर आणि नितीन कांबळे यांच्या पुढाकाराने हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती साई सेवा हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक उत्तम पालांडे यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amrita Pandey: प्रसिद्ध अभिनेत्री फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली; मृत्यूच्या काही तास आधीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचा दारूण पराभव; कोलकताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा 'या' कारला आहे मागणी

SCROLL FOR NEXT