heart attack in women google
लाईफस्टाईल

Heart Attack: डॉक्टरांनी सांगितल्या ४ सवयी ज्या वाढवतात हार्ट अटॅकचा धोका; वेळीच लक्ष दिल्यास जीव वाचेल

heart attack risk habits: २५ वर्षांचा अनुभव असलेले कार्डिओथोरॅसिक सर्जन डॉ. जेरमी लंडन यांनी हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी काही महत्त्वाच्या सवयींबद्दल इशारा दिला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आजच्या जीवनशैलीमुळे आपल्या दैनंदिन जीवनातील सुखसोयी वाढल्या आहेत. मात्र याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होत असतो. या सवयी तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर खोलवर नकारात्मक परिणाम करतात. हृदयाचे आजार किंवा हार्ट अटॅक हे जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक बनला आहे.

हार्ट अटॅक हा जीवनशैलीशी संबंधित आहे. याचाच अर्थ आपण आपल्या सवयी सुधारल्या तर तुम्ही तुमच्या हृदयाचं संरक्षण करू शकता. हार्ट अटॅक टाळण्यासाठी चार हानिकारक सवयी सोडल्या पाहिजेत असं हृदयरोग सर्जन डॉ. जेरेमी लंडन यांनी स्पष्ट केलंय. हृदयरोग टाळण्यासाठी कोणत्या सवयी टाळल्या पाहिजेत हे जाणून घेतलं पाहिजे.

धुम्रपान

धूम्रपानाचा तुमच्या फुफ्फुसांवरच नाही तर हृदयावरही नकारात्मक परिणाम होतो. सिगारेटच्या धुरातील निकोटीन आणि कार्बन मोनोऑक्साइड रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी करतात. यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक जमा होऊन हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

प्रोसेस्ट फूड टाळा

पॅकेज्ड चिप्स, जास्त साखर असलेलं पे, पॅक्ज फूड आणि फास्ट फूड हे अल्ट्रा-प्रोसेस्ड मानले जातात. त्यामध्ये सोडियम, फॅट्स आणि साखरेचं प्रमाण जास्त असतं. जास्त मीठामुळे तुमचा रक्तदाब वाढू शकतो. तर ट्रान्स फॅटमुळे खराब कोलेस्ट्रॉल वाढू शकतं आणि रक्तवाहिन्या ब्लॉक होऊ शकतात. परिणामी हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

दारूचं सेवन

लोक सहसा असं मानतात की, मर्यादित प्रमाणात अल्कोहोल हे आपल्या शरीरासाठी हानीकारक नसतं. मात्र हृदयाच्या बाबतीत एक पेग देखील धोकादायक असतो. अल्कोहोल हृदयाच्या स्नायूंना कमकुवत करू शकते. यामुळे हाय ब्लड प्रेशर, अनियमित हृदयाचे ठोके आणि ट्रायग्लिसराइडची पातळी वाढू शकते.

बैठी जीवनशैली

बरेच तास खुर्चीवर बसणं किंवा व्यायाम न करणं हे एक प्रमुख कारण मानलं जातं. ज्यावेळी आपण एक्टिव्ह नसतो तेव्हा आपलं चयापचय मंदावतं. परिणामी लठ्ठपणा, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. या तिन्ही गोष्टी हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढवतात.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tighee Movie: आई–मुलींच्या नात्याच्या नाजूक छटा उलगडणारा; सोनाली कुलकर्णीच्या 'तिघी' चित्रपटाचा इमोशनल टीझर प्रदर्शित

Indian Railways: रेल्वेच्या नियमात मोठे बदल! किलोमीटरप्रमाणे लागणार भाडे, 200 किमीच्या प्रवासाठी मोजावे लागतील 150 रुपये

Pune Result: नातीगोती- महिला राज, सर्वाधिक मताधिक्य; तर कुठे शहराध्यक्षांचे पराभव, पुणे महापालिकेच्या निकालाचे A टू Z अपडेट्स

Zinga Masala Recipe: रविवारी घरीच बनवा हॉटेलसारखा झणझणीत झिंगा मसाला, सोपी आहे रेसिपी

Govinda Affair: 'मी त्याला माफ करणार नाही...' गोविंदाच्या अफेअरवर पत्नीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाली ६३ वर्षे...

SCROLL FOR NEXT