Heart attack  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

तणावामुळे किंवा वाढलेल्या वजनामुळे येऊ शकतो हृदयविकाराचा झटका

शरीरातील महत्त्वाच्या अवयवांपैकी महत्त्वाचा असा अवयव आहे हृदय.

कोमल दामुद्रे

मुंबई : शरीरातील महत्त्वाच्या अवयवांपैकी महत्त्वाचा असा अवयव आहे हृदय. हृदयाचे कार्य थांबले की, क्षणार्धात माणसांचा जीव जाऊ शकतो. हृदयाशी संबंधित आजार हे सहज होत नाही ते वेळोवेळी आपल्याला त्याचे संकेत देत असतात.

हे देखील पहा -

हृदयविकाराचा झटका किंवा त्याच्या रक्तवाहिन्यासंबंधित असणाऱ्या आजारांनी दरवर्षी १८ दशलक्ष लोकांचा जीव जातो. यामध्ये वयोवृध्दांचा समावेश अधिक आहे. अधिक तणाव व सतत वाढलेल्या वजनाकडे आपण नेहेमी दुर्लक्ष करत असतो. तणावामुळे आपल्याला अनेक प्रकारचे आजार होतात त्यातील एक हृदयविकाराचा झटका आहे. वाढलेल्या वजानामुळे आपल्याला चालताना धाप लागते. शरीराची योग्यरित्या हालचाल न झाल्यास आपल्या हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

- बॉलीवूडला मागच्या काही काळात हृदयविकाराचा विळखा बसला आहे. त्यातील बरेच जणांचे निधन हे अवघ्या तरुण वयात झाल्याचे दिसून आले. याचे वाढलेले प्रमाण लक्षात घेता अधिक ताण घेतल्यास हा झटका येऊ शकतो असे निदान प्राप्त झाले आहे. तणावामुळे छातीत जळजळ होते ते आपल्या हृदयासाठी अधिक घातक ठरु शकते. तसेच लठ्ठपणा, निद्रानाश व व्यायामाच्या अभावामुळे झटका येऊ शकतो.

- अपुरी झोप हे सगळ्या आजारांचे मूळ आहे. त्यात सगळ्यात जास्त परिणाम हा आपल्या हृदयावर होतो. झोप न लागणे किंवा निद्रानाश सारखे आजार हे उच्च रक्तदाबाशी निगडीत असतात. यासाठी वेळीच डॉक्टरांचा (Doctor) सल्ला घ्यावा.

- मद्यपानाच्या अतिसेवनामुळे उच्च रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. मद्यपानाच्या अतिसेवनामुळे वजन देखील वाढते त्यामुळे हृदयविकाराचा झटका (Heart attack) येण्याची शक्यता अधिक वाढते.

- सतत अधिक प्रमाणात खाल्ल्यामुळे आपले वजन वाढू शकते व त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागतो. त्यामुळे मधुमेह, रक्तदाब, ऑस्टियोआर्थरायटिस, फॅटी लिव्हर डिसीज, स्लीप एपनिया यांसारखे आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Homeguard Recruitment : होमगार्डसाठी वयोमर्यादा किती आहे? जाणून घ्या महत्वाचे नियम अन् शेवटची तारीख

Maharashtra Nagar Parishad Live : शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला पैसे वाटताना नागरिकांनी पकडलं

सिन्नरमध्ये मतदानावेळी वाद; अजित पवारांच्या उमेदवाराच्या समर्थकावर स्प्रे हल्ला, २ गटात तुफान हाणामारी|VIDEO

Alibaug Travel : अलिबागमध्ये लपलेले सुंदर रत्न, निसर्ग सौंदर्याने सजलाय 'हा' समुद्रकिनारा

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीमुळे मी आणि समरजीतसिंह घाडगे एकत्र आलो - मंत्री हसन मुश्रीफ

SCROLL FOR NEXT