Health Tips freepik
लाईफस्टाईल

Health Tips: एक कप ब्लॅक कॉफी! सकाळची सुरुवात होईल ऊर्जावान आणि निरोगी

Black Coffee Morning Energy: जर सकाळी उठल्यावर थकवा वाटत असेल आणि मन सुस्त असेल, तर एक कप ब्लॅक कॉफी तुम्हाला उर्जित करून ताजेतवाने करेल. ब्लॅक कॉफीचे फायदे जाणून घेऊया.

Dhanshri Shintre

बहुतेक लोक दिवसाची सुरुवात चहा प्यायला करतात, पण अभ्यासानुसार मध्यम प्रमाणात चहा आरोग्यासाठी फायदेशीर असला तरी, ब्लॅक कॉफीने दिवस सुरू केल्यास अधिक फायदे मिळू शकतात. कॉफीतील कॅफिन तुमचा मूड सुधारतो, विचार करण्याची क्षमता वाढवतो आणि क्रीडा कार्यक्षमता सुधारतो. तसेच, ब्लॅक कॉफी थकवा कमी करते आणि तुम्हाला ऊर्जा देते, ज्यामुळे दिवसभर तुम्ही ताजेतवाने राहू शकता.

जर सकाळी उठताच तुम्हाला थकवा जाणवत असेल आणि मन सुस्त असेल, तर एक कप ब्लॅक कॉफी तुम्हाला ताजेतवाने करू शकते. ब्लॅक कॉफी केवळ झोप उडवण्याचं साधन नाही तर वजन कमी करणे, हृदयरोग, अल्झायमर आणि टाइप-२ मधुमेह यांसारख्या आजारांमध्येही फायदेशीर आहे. मध्यम सेवनाने आरोग्यावर अनेक सकारात्मक परिणाम होतात.

ब्लॅक कॉफी ऊर्जा वाढवण्यास मदत करते. त्यातील कॅफिन मेंदूतील न्यूरोट्रांसमीटर डोपामाइन आणि नॉरएड्रेनालाईनला सक्रिय करून मूड सुधारतो आणि ताजेतवाने वाटते. सकाळी ब्लॅक कॉफी प्यायल्याने दिवसभर उर्जा टिकते आणि कामावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.

कॉफीमध्ये अँटीडिप्रेसंट गुणधर्म असतात, जे मेंदूमध्ये सेरोटोनिन आणि डोपामाइनचे प्रमाण वाढवून नैराश्य, एकाकीपणा आणि उदासीनता कमी करतात. सतत सुस्ती वाटत असल्यास, दिवसाची सुरुवात ब्लॅक कॉफीने करणे मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते आणि ताजेतवाने ठेवते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्गमध्ये विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला

Viral Video: दुकानासमोर उभा असता तो आला अन्...; भारतीय तरुणाला अमेरिकेत मारहाण, VIDEO व्हायरल

Cloudburst: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, ७ नागरिकांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

लाडकी बहिणीनंतर एकनाथ शिंदे लाडकी सुनबाई योजनेची घोषणा करणार का? अजितदादा म्हणाले...

Google Pixel 10 च्या लॉन्चची तारीख ठरली! जाणून घ्या फोनचे भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT