99% Heart Attacks & Strokes Linked to Bad Habits saam tv
लाईफस्टाईल

Heart Attack Prevention: हार्ट अटॅक अन् स्ट्रोक 'या' चुकांमुळे होतो, उपाय वेळीच जाणून घ्या, नाहीतर...

Stroke Prevention: हार्ट अटॅक आणि स्ट्रोकपासून बचाव शक्य आहे. चुकीच्या सवयींमुळे होणारा धोका कमी करण्यासाठी जाणून घ्या हे प्रभावी घरगुती आणि वैद्यकीय उपाय.

Sakshi Sunil Jadhav

सध्याच्या दगदगीच्या जीवनशैलीमुळे आहाराच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. आहारासोबत राहणीमान, झोपेचे नियोजन, व्यायाम या सगळ्या गोष्टी सातत्याने पाळल्या जात नाहीयेत. त्यामुळे अनेकांना जीवघेण्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यातीलच दोन गंभीर आजार म्हणजे हार्ट अटॅक आणि स्ट्रोक.

आपण अनेकदा समजतो की हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक हे अचानक होतात. मात्र जर्नल ऑफ द अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डियोलॉजीमध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका मोठ्या संशोधनात हा समज पूर्णपणे चुकीचा ठरवला आहे. या अभ्यासात असे दिसून आले आहे की, हार्ट अटॅक आणि स्ट्रोक हे अचानक होत नाहीत. या संशोधनासाठी कोरियातील सहा लाखांहून अधिक लोक आणि अमेरिकेतील १२०० हून अधिक रुग्णांचा डेटा तपासण्यात आला. ९९ टक्के रुग्णांमध्ये हार्ट अटॅक किंवा ब्रेन स्ट्रोक होण्यापूर्वी किमान एक मोठा रिस्क फॅक्टर म्हणजे धोक्याचा घटक आढळला.

हाय ब्लड प्रेशर

तज्ज्ञांनी या अभ्यासात सर्वात मोठा धोका हाय ब्लड प्रेशर हा असल्याचे स्पष्ट केले. तब्बल ९६ टक्के रुग्णांमध्ये उच्च रक्तदाब आढळला. हा एक सायलेंट किलर आहे. हाय बीपीमुळे धमन्यांवर दबाव वाढतो, त्यामुळे हृदयाची कार्यक्षमता कमी होते आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. त्यामुळे मीठाचे सेवन कमी करा, दररोज चाला, ताण कमी करा आणि बीपी नियमित तपासा.

स्मोकिंग करणे

दुसरा मोठा धोका म्हणजे स्मोकिंग. या अभ्यासात ६८ टक्के रुग्ण हे धूम्रपान करणारे होते. सिगारेटमधील रासायनिक घटक रक्तवाहिन्यांना आकुंचन करतात. ज्यामुळे रक्तप्रवाह आणि ऑक्सिजनचा पुरवठा दोन्ही कमी होतो. यासाठी तात्काळ धूम्रपान सोडा, डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि निकोटिन रिप्लेसमेंट थेरपी वापरणे हे उपाय प्रभावी ठरू शकतात.

कोलेस्टेरॉल करणे

तिसरा घटक म्हणजे हाय कोलेस्टेरॉल. खराब कोलेस्टेरॉलमुळे धमन्यांच्या भिंतींवर प्लॅक तयार होतो. हा प्लॅक पुढे जाऊन ब्लॉकेजमध्ये बदलतो आणि हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो. संतुलित आहार, तळलेले पदार्थ टाळणे, ओमेगा-३ फॅटी अॅसिड असलेले खाद्यपदार्थ घेणे आणि नियमित ब्लड टेस्ट करणे हे आवश्यक आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP MLA Threat: भाजप आमदाराला जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Live News Update: कुख्यात गुंड गजा मारणे जेलमधून सुटल्यानंतर थेट पुणे पोलीस आयुक्तालयात

Saturday Horoscope: आज महत्वाची कामे करताना सावधान, ५ राशींसाठी आनंदाचा दिवस, वाचा शनिवारचे राशीभविष्य

पंतप्रधान मोदींनी केले जगातील सर्वात उंच श्री राम पुतळ्याचे अनावरण, जाणून घ्या या ७७ फूट उंचीच्या पुतळ्याची खास वैशिष्ट्ये

India GDP: भारताची अर्थव्यवस्था बुलेट स्पीडनं सुस्साट; GDPनं गाठला मोठा टप्पा, 'या' क्षेत्रात जबरदस्त कामगिरी

SCROLL FOR NEXT