Coconut Water in Summer  Saam TV
लाईफस्टाईल

Coconut Water in Summer : 'या' ५ पद्धतीने नारळ पाणी प्या आणि तंदुरुस्त राहा; शरिरातील उष्णता चुटकीसरशी होईल गायब

5 Ways Consume Coconut Water : उष्णता वाढत असल्याने अनेकजण नारळ पाणी पिणे पसंत करतात. साधं नारळ पाणी चविष्ट बनवण्याची पद्धती जाणून घेऊ.

Ruchika Jadhav

राज्यात सध्या उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे अनेक व्यक्तींना उष्माघाताच्या समस्या येत आहेत. उष्णतेमुळे शरिरातील पाणी कमी होते, डिहायड्रेशन होते. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती विविध पेय पित शरिरातील उष्णता वाढू देत नाहीत. अनेकजण अशावेळी नारळ पाणी पिणे पसंत करतात. त्यामुळे या बातमीतून साधं नारळ पाणी चविष्ट बनवण्याची पद्धती जाणून घेऊ.

नारळाचे पाणी स्मूदी बाऊल्स

फक्त नारळ पाणी पिण्यास लहान मुलं कंटाळा करतात त्यामुळे तुम्ही नारळ पाणीचे स्मूदी बाऊल्स बनवू शकता. नारळ पाणी स्मुदी बनवण्यासाठी आंबा, चिकू, केळी ही फळे नारळ पाण्यात मिक्सरला बारीक करून घ्या. तयार स्मूदी एका भांड्यात काढून त्यावर विविध फळांचे तुकडे टाकून घ्या.

शहाळे आईस्क्रिम

उन्हाळ्यात सर्वचजण आईस्क्रिमवर ताव मारतात. त्यामुळे नारळ पाणीपासून तुम्ही घरच्याघरी आईस्क्रिम देखील बनवू शकता. अननस, टरबूज अशा फळांमध्ये नारळ पाणी आणि त्याची मलई टाकून टेक्सचर तयार करून घ्या. आईस्क्रिम बॉक्समध्ये टाकून फ्रिजमध्ये सेट करून घ्या.

नारळ पाणी मॉकटेल

ताज्या फळांची प्युरी आणि लिंबाचा रस यामध्ये नारळाचं पाणी मिक्स करून घ्या. यात पुदीन्याची पानं आणि फळांचे काही तुकडे टाकून घ्या. जेवणासोबत तुम्ही हे पेय पिऊ शकता.

नारळ पाणी सॅलड

काकडी, आंबा, चिकू अशा विविध फळांसह तुम्ही नारळ पाणी मलई आणि थोडा लिंबाचा सर मिक्स केल्यास उत्तम सॅलड तयार होते. हे सॅलड तुम्ही वजन कमी करण्यासाठी हमखास खावे.

शरिरासाठी विविध फायदे

नारळ पाणी पिण्याचे आरोग्यासाठी विविध फायदे आहेत. नारळ पाणी पिल्याने आपला रक्तदाब नियंत्रित राहतो. शरिरातील कॅलरी योग्य प्रमाणात राहतात. यामध्ये जास्त साखर नसल्याने मधुमेह असलेल्या व्यक्तींनी आहारात नारळ पाण्याचा विविध पद्धतीने समावेश करावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

Maharashtra Fort : ५,१४१ फूट उंचीवर दिमाखात उभा आहे किल्ला, २-३ तासांचा थरार ट्रेक करून गाठता येतो माथा

Black Coffee For Weight Loss: 30 दिवस ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन कमी होते का? जाणून घ्या

Weight Loss : वाढतं वजन अन् चरबीची चिंता सोडा! आजपासूनच डाएटमध्ये खा 'या' पिठाची भाकरी

Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

SCROLL FOR NEXT