Weight Loss : वाढतं वजन अन् चरबीची चिंता सोडा! आजपासूनच डाएटमध्ये खा 'या' पिठाची भाकरी

Shreya Maskar

वजन कमी

तुम्ही जर वजन कमी करण्यासाठी डाएट प्लान आखत असाल तर यात हेल्दी भाकरीचा समावेश करणे खूप गरजेचे आहे. भाकरीमध्ये जास्त पोषक घटक असतात.

Weight Loss | pinterest

ज्वारीची भाकरी

वजन कमी करण्यासाठी ज्वारीची भाकरी खूप फायदेशीर ठरते. हे ग्लूटेन-मुक्त धान्य आहे. यात भरपूर प्रमाणात फायबर असतात आणि ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.

Sorghum bread | pinterest

बाजरीची भाकरी

बाजरीच्या भाकरीमध्ये प्रोटीन, लोह आणि हळू पचणारे 'कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स' भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Millet bread | pinterest

नाचणीची भाकरीचा

नाचणीच्या भाकरीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि त्यात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. यामुळे अतिखाणे टाळण्यास आणि खाण्याची अचानक होणारी तीव्र इच्छा नियंत्रित करण्यास मदत होते.

ragi bread | pinterest

गव्हाच्या पिठाची भाकरी

गव्हाच्या पिठाची भाकरी हा रोजच्या आहारातील एक उत्तम आणि पारंपरिक पर्याय आहे. मात्र त्यासाठी जेवणाचे प्रमाण योग्य राखणे आणि त्यात अतिरिक्त तूप किंवा लोणी घालणे टाळणे आवश्यक आहे.

Wheat flour bread | pinterest

बार्लीच्या पिठाची भाकरी

बार्लीचे पीठ (जवाचे पीठ) पोटासाठी खूप चांगले मानले जाते. उच्च फायबरचा स्रोत आहे.बार्लीच्या पिठापासून बनवलेल्या रोटीमुळे पोटदुखी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो.

Barley flour bread | pinterest

हरभऱ्याच्या पिठाची भाकरी

हरभऱ्याच्या पिठाची भाकरी खाल्ल्याने स्नायू मजबूत होतात. हरभऱ्याच्या पिठात प्रथिनांचे प्रमाणही जास्त असते, जे शरीरासाठी फायदेशीर आहे.

Gram flour bread | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : सकाळच्या नाश्त्यात चुकूनही खाऊ नका 'हे' ५ पदार्थ, झपाट्याने वाढेल वजन अन्...

Weight Loss | AI PHOTO
येथे क्लिक करा...