Shreya Maskar
चहा-बिस्किटांमध्ये मैदा आणि साखर असते, ज्यामुळे ग्लुकोजचे आणि इन्सुलिनचे प्रमाण झपाट्याने वाढते. तसेच यामुळे भूक ही भागत नाही. ब्रेड-जॅममध्ये परिष्कृत कर्बोदके असतात. यामुळे इन्सुलिन वेगाने वाढते. लवकर भूक लागते.
पीठ आणि बटाट्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. तसेच जास्त तेल आणि तूप वापरल्यास कॅलरीज वाढतात. हे पचायला जड आहे.
पुरी डीय फ्रायिंग केल्यामुळे जास्त कॅलरीज वाढतात. यात पोट कमी भरते मात्र खाण्याची इच्छा वारंवार होते. जे आरोग्यास धोकादायक ठरते.
फरसाण-चहामध्ये रिफाईंड कार्ब्स, फॅटचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे इन्सुलिन वाढते. यात प्रोटीन आणि फायबर खूप कमी असते.
कॉर्नफ्लेक्स - दूध वेगाने ग्लुकोज आणि इन्सुलिन वाढवते. यात अतिरिक्त साखर असते. तसेच हे खाल्ल्यानंतर भूक लवकर लागते.
नाश्त्याला पोहे-उपमा खाल्ल्याने लवकर भूक लागते. रक्तातील साखर वाढते. तसेच इन्सुलिनचे प्रमाणही वाढते. यात प्रोटीन देखील कमी असते.
डोसा-इडली सकाळी नाश्त्याला खाल्ल्यानंतर ग्लुकोजमध्ये वाढ होते. पोट भरत नाही, ज्यामुळे वारंवार खाण्याची इच्छा होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.